Posts

Showing posts from April, 2019

ठाणे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Image

लोकसभा निवडणूक २०१९:अद्यावत संनियंत्रणासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Image
ठाणे,दि.२८(जिमाका)- लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवार दि.२९) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची सर्व जय्यत तयारी सूरु असतांनाच या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यान्वित करण्यात आला आहे. मतदान व एकूणच निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत सर्व बाबींचे संनियंत्रण या कक्षातून होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात हा कक्ष कार्यान्वित झाला असून या ठिकाणी सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर हे स्वतः जातीने लक्ष ठेवतील. आजपासून सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तिथपासून ते उद्या मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये जाई पर्यंत हे सनियंत्रण होईल.या सनियंत्रण कक्षात २३-भिवंडी,२४-कल्याण,२५-ठाणे या तिन्ही मतदार संघाचे सनियंत्रण होत आहे. यात प्रामुख्याने मतदान प्रक्रिया, सुविधा सेवा, सी व्हिजिल ऍप, १९५० हेल्पलाईन नंबर, जिल्ह्यातील ६७१ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग, निवडणूक कामासाठी वापरात अस...

डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल

डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल ठाणे , दि .28 ( जिमाका )-   लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने आय.ई.एस. पाटकर विद्यालय, आयरे रोड डोंबिवली पुर्व येथे निवडणूक कामकाजासाठी साहित्य वितरण व नंतर जमा केले जाणार आहे. दि.28 ते दि.30 या दरम्यान हे काम होणार आहे.त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन रहदारीची कोंडी निर्माण होऊ शकते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात   ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतुक विभागाचे उप आयुक्त यांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, राजाजी पथ गल्ली/ लेन नं 2 या रस्त्याच्या दोन्ही बाजूने व जुना आयरेरोड राजाजी पथ गल्ली/ लेन नं 1 ते मदन ठाकरे रोड दोन्ही बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग-   या कालावधीत सर्व वाहने राजाजी पथ गल्ली नं 1 चिपळूणकर रोडने एस. के. चौक टंडन रोड, म्हाळगी चौक मार्गे स्टेशन परिसरातून इच्छित स्थळी जातील. या कालावधीत राजाजी पथ गल्ली/ लेन नं 2 या रस्त्याच्या दोन्ही बाजूने व जुना आयरेरोड राजाजी पथ गल्ली/ लेन नं 1 ते मदन ठाकरे रोड दोन्ही बाजूने पार...

आधी मतदान मग सुटी- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर प्रशासनाची निवडणूक सज्जता

Image
आधी मतदान मग सुटी- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर प्रशासनाची निवडणूक सज्जता ठाणे , दि .27 ( जिमाका )-   ठाणे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे . जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृतीची मोहिमही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असून सलग सुट्या असल्या तरी नागरिकांनी आधी मतदानाचे राष्ट्रिय कर्तव्य पार पाडून मगच सुटीचा आनंद लुटावा , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले . लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने   प्रशासनाच्या सज्जतेबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी 25 ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार , 23 भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आदी उपस्थित होते . ठाणे जिल्ह्यात सोमवार दि . 29/04/2019 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपावेतो मतदान घेण्यात येणार आहे . यावेळी माहिती देण्यात आली की , जिल्ह्यात 23- भिवंडी , 24- कल्याण , 25- ठाणे हे ...

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक

ठाणे ,   दि . 26   (जिमाका)-   लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक असून ते नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक दस्ताऐवज हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे. याबाबत आवाहन करण्यात आले आहे की, मतदानाचा   हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्येआपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र ( EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र ( EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे. 1. पासपोर्ट 2 . वाहन चालक परवाना (ड्राइव्हिंग लायसन्स ) 3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र) 4. छायाचित्र असलेले बॅकेचे पासबुक 5. पॅनकार्ड 6.NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड 7. मनरेगा ...

ठाणे शहरात वाहतुक मार्गात बदल

ठाणे शहरात वाहतुक मार्गात बदल ठाणे दि. 2 5 (जिमाका) : शहर वाहतुक शाखेच्या ठाणे शाखेत शुक्रवार दि.26 रोजी ठाणे शहर भागात वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.ठाणे मनपा मुख्यालया समोर   जनरल अरुणकुमार वैद्य   मार्ग नौपाडा या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे.या कालवधीत रहदारी सुरळीत रहावी म्हणून येथील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. तो याप्रमाणे जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरील परमार्थ निकेतन कडुन ठाणे मनपा कडे जाणारे तसेच ठाणे मनपा सर्कल कडुन परमार्थ निकेतन   कडे ये-जा करणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . सदरची वाहने परमार्थ निकेतन कडुन रायगड गल्ली मार्गे सरोवर दर्शन बिल्डींग कडुन अल्मेडा रोड ने त्यांचे इच्छित स्थळी जातील.त्याच प्रमाणे टि.एम.सी . सर्कल कडुन परमार्थ निकेतन कडे जाणारी   सर्व वाहने अल्मेडा रोड ने, अथवा निपुण हॉस्पीटल समोरील संत ज्ञानेश्वर रोड कडुन परमार्थ निकेतन मार्गे त्यांचे इच्छित स्थळी जातील. सदरचे बदल    शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 8 ते सभा संपेपर्यंन्त   लागु असुन या अधिसुचनेतुन पोलिसांची वाहने,फायर ब्रिग्रेड,...

सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण

सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण ठाणे दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1) अ व 75(2)(अ) मधील तरतुदीनुसार सन 2017-18 चे सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण 31 जुलै 2019 अखेर होणे आवश्यक आहे.ज्या संस्था लेखा परीक्षण करणार नाहीत,तसेच लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देणार नाहीत.त्याच्यावर सहकारी संस्था अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल असे जिल्हा विशेष लेखा परीक्षक सदानंद वुईके यांनी कळविले आहे.

राजीव गांधी चौक-जिलानीवाडी रस्त्यावर सम-विषम तारखेनुसार पार्किग

राजीव गांधी चौक-जिलानीवाडी रस्त्यावर सम-विषम तारखेनुसार पार्किग ठाणे दि. 24 (जिमाका) : ठाणे महानगरपालिका हद्दीत वागळे वाहतुक उपविभागात राजीव गांधी चौक ते जिलानीवाडी या भागात अर्जुन पार्क सोसायटी(रोड नं.10) समोरील रस्त्यावर होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुक कोंडी होत असते.त्यामुळे सदर रस्ता   वर 10 रोडच्या डाव्या बाजुस पी -1 प्रमाणे विषम   तारखेस आणि अर्जुन पार्क सोसायटी (रोड नं.10 )समोरील रोडच्या उजव्या बाजुस पी-2 प्रमाणे सम तारखेस दुचाकी व हलक्या वाहनांना पार्किंग साठी परवानगी देण्याचे आदेश पोलीस उप आयुक्त शहर वाहतुक विभाग ठाणे शहर अमित काळे यांनी वाहतुक नियंत्रण अधिसुचनेद्वारे दिले आहेत.सदर पार्किंग व्यवस्था ही 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर आहे.या संदर्भात नागरीकांनी आपली हरकत-सुचना लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त,शहर वाहतुक शाखा कार्यालय,तीन हात नाका,ठाणे 400602 येथे पाठवाव्या.हरकत सुचना न आल्यास पुढील आदेश होईपर्यत हेच आदेश अंमलात राहतील,असेही कळविण्यात आले आहे.

डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल

डोंबिवली शहरात वाहतुक मार्गात बदल ठाणे दि. 24 (जिमाका) : शहर वाहतुक शाखेच्या डोंबिवली शाखेत गुरुवार दि.25 रोजी डोंबिवली पुर्व भागात वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.आप्पा दातार चौक येथे आयोजित निवडणुक प्रचार सभेनिमित्त हा बदल करण्यात आले आहेत.या बदलानुसार गणपती मंदिर रोड,छेडा रोड,फडके रोड,मदन ठाकरे चौक,आप्पादार चौक,बाजीप्रभू चौक,आगरकर रोड,एच,डी,एफ,सी बॅकेसमोरील रोड येथे वाहतुक कोंडी निर्माण होऊ नये म्हणुन फडके रोड कडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.त्यामुळे ठाकुर्ली जोशी हायस्कुल समोरील रोडने येणारी वाहने ने हरु रोड मार्गे स्टेशन   परिसरात जातील.तर फडके रोड कडे येणारी वाहने टिळक रोडने,सावरकर रोडने इंदिरा चौक मार्गे स्टेशन परिसरात जातील.तसेच सरद प्रचार सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्कीगची व्यवस्था नेहरु मैदान येथे करण्यात आली आहे.ही अधिसुचना गुरुवार दि.25 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत लागु असुन या आधिसुचनेतुन पोलीसांची वाहने ,फायर ब्रिग्रेड,रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे,असे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांनी कळवले आहे.

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे शहरात मनाई आदेश ठाणे दि. 22 (जिमाका) : आगामी काळात जिल्हातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये विवेक फणसळकर   पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी मनाई आदेश लागु केला आहे.सदर मनाई आदेश दि.5   मे च्या   मध्यरात्री पर्यंत लागु असेल या आदेशांचा भंग करणाऱ्या विरुध्द   कलम 135 प्रमाणे कायदेशीर   कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 0000000

खरीप हंगाम 2019; 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन

Image
                                                                                          खरीप हंगाम 2019; 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन ठाणे दि . 22 (जिमाका)-   सन 2019 च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून या हंगामात 1 लक्ष 57 हजार 949 मे. टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राज...

सायकल रॅलीतून दिला मतदानाचा संदेश

Image
                                                                                               सायकल रॅलीतून दिला मतदानाचा संदेश ठाणे दि . 21 (जिमाका)-   लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. आज ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी   सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी होत ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश दिला. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोरुन या रॅलीस सुरुवात झाली. यावेळी   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी   राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसेकर, ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर...

मतदार जनजागृतीसाठी आज (रविवारी) सायकल रॅली

ठाणे दि.२०(जिमाका)-   लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने रविवार दि.२१रोजी सायंकाळी ५ वाजता मतदार जनजागृतीसाठी  सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेचारवाजेपर्यंत सर्व सायकलपटूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमावे , असे आवाहन स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक-२०१९:दिव्यांग मतदारांसाठी विशेष वाहन व्यवस्था-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,धावतील ७४० रिक्षा,२० बसेस

Image
ठाणे , दि.२०(जिमाका):- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक सहज सोपी व्हावी , यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार दि.२९ रोजी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे , या व्यवस्थेत ७४० रिक्षा व २० बसेस चा समावेश असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ ही करण्यात येईल , अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकारांना दिली. ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांसाठी मतदानाच्या दिवशी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन , रंगीत तालीम आज पत्रकारांसमवेत करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी , स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर , सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार , ठाणे मनपाचे परिवहन अधिकारी , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की , जिल्ह्यात २३-भिवंडी- २१११ , २४ कल्याण-२२६९ , २५ ठाणे-३५६५ असे एकूण ७९४५ दिव्यांग मतदार नोंदीत केलेले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा जादा दिव्यांग मतदार असतील या अनुमानाने व दिव्यांग व्यक्तीसोबत एक त्यांचे सहायक ...