Posts

Showing posts from March, 2025

बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

Image
ठाणे , दि. 31( जिमाका):- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम , २०१५ मधील प्रकरण ५ मधील कलम २७ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम , २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे , बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम , २०१८ चा नियम ९० च्या अन्वये गठित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम , २०१८ च्या नियम ९१च्या अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-१ येथील ०१ अध्यक्ष व ०४ सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील ०२ सदस्य , धुळे , यवतमाळ , सोलापूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी ०१ सदस्य पदे अशी एकूण १० पदे वगळून उर्वरित सर्व बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय , शैक्षणिक पात्रता , अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह १५ दिवसांच्या आत जिल्हा महिला ...

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Image
ठाणे , दि.३१ (जिमाका)– महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र वैद्यकीय परिषद , मुंबई यांनी दि.१७ जानेवारी २०२५ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार , महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर ९ सदस्यांच्या निवडणुकीसाठी इमारत क्र. ६ व इमारत क्र. ७ , डॉ. बिंदा मांजरमकर विद्या प्रसारक मंडळाचे बी.एन. बांदोडकर महाविद्यालय , जननद्वीप , चेंदणी बंदर रोड , ठाणे (प) - ४००६०१ येथे १४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मतदान गुरुवार , दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत असलेले ( R.M.P.) वैद्यकीय व्यवसाय करणारे व मतदार यादीत नाव असलेले मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर खालीलपैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करू शकतात: १. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र. २. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले नोंदणीपत्र (छायाचित्र असलेले). ३. भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार फोटो ओळखपत्र ( EPIC). ४. आधार कार्ड ( Aadhaar Card). ५. बँक/पोस्ट ऑफिसने...

विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न

Image
"मिशन 100 डेज" कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून पाहावी  - विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी   ठाणे,दि.28(जिमाका):- सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात सौजन्याची वागणूक मिळावी. त्यासाठी विशेष लक्ष द्यावे. या "मिशन 100 डेज" कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून पाहावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.       शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.      याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या विभाग/कार्यालयप्रमुखांची उपस्थिती होती.   यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद हिवाळे व इतर अध...

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

Image
आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान ठाणे,दि.27(जिमाका):-  शासनाच्या ‘मिशन 100 डेज् ’   अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथील उपलब्ध औषधसाठा, स्वच्छता तसेच इतर सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची खातरजमा करण्यासाठी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली. यावेळी त्यांनी आपली ईसीजी चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट अवघ्या 3 मिनिटात प्राप्त झाला. या घटनेमुळे प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या तत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी आरोग्य विभागाचे आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दिलेल्या अचानक भेटीचे कौतुक केले. याप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपल्या हातून जनतेची सेवा घडत राहावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळायला हवा. यासाठी सर्वांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे आपली कर्तव्यपूर्ती करावी...

गिग / प्लॅटफॉर्म कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी मोहीम सुरु

ठाणे,दि.27(जिमाका):-  झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर, ब्लिंकिट व झेप्टो यासारख्या प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्या गिग कामगारांमुळे भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. लाखो गिग कामगार उदा. डिलीवरी बॉय, रायडर, ड्रायव्हर या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा गिग कामगारांना त्यांच्या सुरक्षित भविष्याकरीता शासकीय योजनांचा लाभ मिळावा, म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलद्वारे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची नोंदणी केली जाणार असून त्यांच्या नोंदणीकरिता ई-श्रम पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणीकरिता गिग कामगारांनी  http://register.eshram.gov.in/ #/user/platform-worker- regitration  या अधिकृत लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. नोंदणीकरिता अडचण असल्यास जिल्ह्यातील नजिकच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करावा. नोंदीत गिग कामगारांना केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. तरी, सर्व प्लॅटफॉर्म / गिग कामगारांना ई-श्रम पोर्टल...

ठाणे महसूल विभागातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न

Image
ठाणे,दि.27(जिमाका):-  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन भवन समिती सभागृहामध्ये आज पायाभूत प्रशिक्षण पार पडले. यावेळी प्र.अपर जिल्हाधिकारी विकास गजरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाद्वारे सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक आणि ग्राम महसूल अधिकारी या पदांवरील कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना रजा नियम, शिस्त व अपील, टिपणी व पत्रलेखन, सहा गठ्ठा पद्धती, ई-ऑफिस, IGOT, आर्थिक व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी सहा गठ्ठा पद्धती, उपअधिदान व लेखा अधिकारी भानुदास जठार, लेखाधिकारी अश्विनी सुर्वे व अश्लेषा जाधव यांनी रजा नियम, शिस्त व अपील, टिपणी व पत्रलेखन या विषयीचे मार्गदर्शन केले. तसेच ई-ऑफिस प्रणालीचे जिल्हा समन्वयक कृष्णा उथळे, विभागीय आयुक्त कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीच्या ...

गुंतवणूकदार उद्योजकांचे जिल्ह्यात स्वागत.. उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

Image
ठाणे,दि.26(जिमाका):-  जिल्ह्यामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी, याकरिता सामूहिक प्रयत्न करण्यात येतील. यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. “ मिशन 100 डेज् ”  अंतर्गत गुंतवणूक प्रचार-प्रसार आणि प्रोत्साहन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा निश्चित करून त्याची प्रभावी कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. शासन निर्णयातील 7 कलमी कृती आराखड्यामध्ये  “ गुंतवणूकीस प्रोत्साहन ”  अंतर्गत गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरिता सामूहिक प्रयत्न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज ऑफ ...

स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कमळ व वॉटर लिली रोपांची लागवड

Image
ठाणे,दि.26(जिमाका):-  शासनाच्या  “ मिशन - 100 डेज् ”  अंतर्गत शासकीय कार्यांलयांसाठी 7 कलमी कृती आराखडा लागू केला असून त्याअंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात  “ टेरेस गार्डन ”  ही संकल्पना राबविण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांचे दि.23 मार्च 2025 रोजी अपघाती निधन झाले.  “ टेरेस गार्डन ”  उपक्रमाची सुरुवात म्हणून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने आज आपल्या कार्यालयाच्या आवारात स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ कमळ व वॉटर लिली या रोपांची लागवड केली आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी, समाजसेवक मोहन शिरकर आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. “ टेरेस गार्डन ”  ही संकल्पना ठाणे शहरातील वृक्षतज्ञ श्री.विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात येत आहे. श्री.विजयकुमार कट्टी हे नागरिकांना डासविरहित परिसर ठेवण्याकरिता तसेच मानवी जीवनाकरिता इतर उपयुक्त झाडांच...

ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती गठित करुन तसा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय येथे सादर करावा

ठाणे,दि.26(जिमाका):-  कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार, 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खासगी आस्थापनांनी अशा समितीचे गठन करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना, तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्था, एंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्यसेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, शुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले आदी ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयाच्या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती गठित करणे बंधनकारक आहे. समिती न स्थापल...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्थेतर्फे महिलांकरीता आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ठाणे,दि.26(जिमाका):-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्था (कनक), ठाणे यांच्या संमुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे येथे दि.25 मार्च 2025 रोजी महिला न्यायालयीन कर्मचारी व महिला विधीज्ञ यांच्याकरिता सर्विकल कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एन.ए. कंक, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती वसुधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे श्री.एस के फोकमारे, 7वे सह दिवाणी न्यायाधीश, ठाणे श्री.ए.सी. डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्था ठाणे (कनक) तर्फे डॉ.श्वेतांबरी पडवळ व इतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका वर्ग तसेच जिल्हा न्यायालय, ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सर्व कर्मचार...

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंद्यांकरिता “जीवन गाणे गात जावे” सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Image
ठाणे,दि.26(जिमाका):-  ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरिता सांस्कृतिक कार्य विभाग तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा व महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.सुहास वारके (भा.पो.से) व कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दि.25 मार्च 2025 रोजी कारागृहामध्ये दाखल बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या तसेच बंधांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रयोधनात्मक स्वरूप असणाऱ्या  “ जीवन गाणे गातच जावे ”  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती राणी भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम संयोजक आर्यन देसाई, उपअधीक्षक श्री.डी.टी. डाबेराव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.के.पी. भवर उपस्थित होते. “ जीवन गाणे गात जावे ”  या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांना प्रेरणा देवून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज जी...