Posts

Showing posts from June, 2025

प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे ऑटो रिक्षा वाहनांकरिता नवीन मालिका सुरु

Image
ठाणे,दि.30(जिमाका):-  प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे VAHAN या संगणक प्रणालीवर परिवहन संवर्गांतील ऑटो रिक्षा वाहनांकरिता सध्या सुरु असलेली MH-04-LX मालिका संपल्यानंतर तात्काळ नवीन मालिका MH-04-MT सुरु करण्यात येणार आहे. अटींना अधिन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी दि.01 जुलै 2025 पासून अर्ज स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहीत शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी कळविले आहे. 00000

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात 3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंद

Image
अॅप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी   ठाणे,दि.30(जिमाका):-  ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात कृषी विस्ताराची माहिती देण्यासाठी आत्तापर्यंत 3 हजार 953 उपक्रम पार पडले आहेत. या उपक्रमांची नोंद अक्षांश रेखांश छायाचित्रांसह प्रथमच अॅप मध्ये करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे खरीपाच्या मोहिमांचे नियोजन कागदोपत्री होते व त्या राबविल्याचे अहवाल गाव पातळीवरून येतात. त्यातून, अनेकदा मोहिम राबविली नसतानाही, अहवाल पाठविले जातात. त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदा प्रथमच कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांना  “ महाकृषी उपयोजन ”  हे ॲप उपलब्ध करून दिले. यातून जिल्ह्यात आजअखेर 22 योजना व कार्यक्रमाच्या नोंदी घेतल्या गेल्या. जिल्ह्यातील अधिकारी देखील क्षेत्रीय भेटीत कार्यक्रम घेतल्यावर त्यांची नोंद महाकृषी मध्ये करीत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले की, जिल्ह्यात महाकृषी खरीप मोहीम अॅप आधारित कामकाज करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी दोन महिने तयारी करण्यात आली. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर होणाऱ्या उपक्रमांची बिनच...

जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24 करिता अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ

Image
ठाणे,दि.30(जिमाका):-  जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. या पुरस्कारांतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्टनाका, ठाणे (प.) येथून प्राप्त करुन घ्यावेत. या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि.30 जून 2025 पूर्वी अथवा पर्यंत आवश्यक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे बंद लिफाफ्यात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि...

शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

       ठाणे,दि.27(जिमाका) :-   येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतक ऱ्यां ना आर्थिक आधार मिळावा याक रि ता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृ षी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागेल. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये आलेली  घट गृहीत धरून विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगाम 2025 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै , 2025 अशी आहे .           योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवणे गरजेचे आहे.  पिक विमा नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे.     कोकण विभागातील ठाणे , पालघर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाकडून नियुक्...

ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / महिला व एकूण अशी सांख्यिकी माहिती सादर करण्याचे आवाहन

  ठाणे,दि.27(जिमाका) :-   ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना याव्दारे अवगत करण्यात येते की, सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / महिला व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतुदींनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.rojgar. mahaswayam.gov.in  या संकेतस्थाळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जून 2025 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर 1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाव्दारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून 100% प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्व...

निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत कार्यशाळा संपन्न

Image
          ठाणे,दि.27(जिमाका) :-   मा. महालेखापाल (ले. व ह.)- महाराष्ट्र-1, मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट जॉन द बॅप्टीस्ट हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज, ठाणे, येथे आज आहरण व संवितरण अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता "पेन्शन अदालत" संपन्न झाली.             यावेळी महालेखाकार कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी  किर्ती दुभाषी,  जया गोमेझ, सुशिस वाघमारे, सुपरवायझर क्रिष्णा कुमारी, सहायक सुपरवायझर संतोष केदारे,  अनिता कर्णिक, गीता पील्लई, वरिष्ठ लेखाधिकारी विश्राम राऊळ, अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत व सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  किर्ती दुभाषी यांनी निवृत्ती वेतन धारकांसाठी दूरदृष्य प्रणालीवर महालेखापाल यांच्या साईटवर निवृत्ती वेतन  सोप्या भाषेत कसे सादर करावे याचे प्रझेंटेशनद्वारे दाखविण्यात आले. या प्रेझेंटेशनमध्ये सेवापुस्तकातील नोंदी , फॅमिली पेन्शन,तात्पुरती पेन्शन,...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

ठाणे,दि.26(जिमाका):-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 पासून  “ प्रथम अर्ज, प्रथम लाभ ”  या तत्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. यासदंर्भात क्षेत्रीयस्तरावर व्यापक प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) यशस्वी अंमलबजापणी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासोबतच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप हंगाम लक्षात घेता दि.15ते 30 जून 2025 या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर गावपातळीपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर जास्तीत जास्त संख्येने  https://mahadbt.maharashtra. gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करून फलोत्पादनविषयक विविध योजनांचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्याल...

आर्थिक वर्ष सन 2024-25 चे आयकर विवरणपत्र (फॉर्म क्र.16) निवृत्तीवेतनधारकांनी डाऊनलोड करावे -जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे

ठाणे,दि.26(जिमाका):-  ठाणे जिल्हा कोषागाराकडून निवृत्ती वेतन घेणाऱ्या व आयकरास पात्र असलेल्या ज्या निवृत्तीवेतन धारकांचा आयकर कपात करण्यात आला आहे, त्यांचे विहीत नमुन्यातील सन 2024-25 या अर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र (फॉर्म क्र.16) तयार असून हे आयकर विवरणपत्र निवृत्तीवेतन धारक  https://topensionthane. blogspot.com/  या लिंकवरून डाऊनलोड करु शकतात. फॉर्म क्र.16 डाऊनलोड करावयाची कार्यपद्धती: Ø   https://topensionthane. blogspot.com/  या संकेतस्थळावर जाणे. Ø   Home button वर क्लिक करणे. Ø   IPAN No. (LAAAAA1234A) टाकणे. Ø   Search button वर क्लिक करणे. Ø   FORM 16 PART A & PART B डाऊनलोड होईल. तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे. 00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
ठाणे,दि.26(जिमाका):-   राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्र.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

Image
ठाणे,दि.26(जिमाका):-  राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता दि.15 जून 2025 ते दि.30 जून 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये 1) कृषी सहाय्यकांमार्फत प्रत्येक गावातील या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्याकरिता नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन वितरक व सेवा व सेतू केंद्रांचे प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच मोहीम स्वरुपात कॅम्प घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. 2) सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाच्या योजनांची माहिती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 3) अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याकरिता स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी इ. च्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 4) महाडीबीटी पोर्टलवर जिल्हानिहाय / तालुकनिहाय दर्शविलेल्या लक्षांकाच्या प्रमाणात ...

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केल्यास ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

ठाणे,दि.25(जिमाका):-  मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या दि.23 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत ऑटोरिक्षाकरिता (सी.एन.जी.) 1.5 कि.मी. करिता किमान 26/-रु. प्रमाणे भाडेदरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या मीटर भाडेदराच्या अनुषंगाने, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेअर-ए-ऑटोरिक्षा मार्गावरील शेअर भाडेदराची गणना करून दिली आहे. त्यामुळे विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाड्याची मागणी करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र.9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटसअॅप 9423448824 क्रमांकावर तक्रार दाखल करावी. त्या तक्रारीची दखल घेऊन ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक प...

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठी शेवटच्या पाच दिवसांची मुदत

ठाणे,दि.25(जिमाका):-  पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांकरिता राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू हे फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. चिकू फळपिकासाठी दि.01 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यान जादा आर्द्रता व जादा पाऊस या हवामान धोक्यांकरिता विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेमध्ये एका शेतकऱ्यास मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. कोकण विभागाकरीता प्रति शेतकरी सहभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे.) व बागेचे वय 5 वर्षे असणे आवश्यक आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र (opt out) योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ई- पीक पाहणीद्वारे नोंदलेले क्षेत्र व विमा उतरविलेले क्षेत्र यामध्ये विस...

'विकसित महाराष्ट्र 2047' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

Image
ठाणे,दि.25(जिमाका):-  'विकसित महाराष्ट्र 2047' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध 16 क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.  https://wa.link/o93s9m  यावर आपले मत नोंदवावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.    भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत -भारत@2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिज...

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा सन्मान

Image
भारतमाता की जय.. वंदे मातरम् च्या जयघोषाने दुमदुमले सभागृह ठाणे,दि.25(जिमाका):-  आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे. सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश अन् देशासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे, हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे केले. भारतामध्ये दि.25 जून 1975 ते दि.31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याव...

विशेष लेख क्र.29 - विशेष मुलाखत - मागासवर्गीय घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद -डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त भाऊ दगडू कांबळे

Image
  महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने सन 1971-72 पासून व्यक्तींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार / समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केली आहे. सन 1989 पासून संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 51 व्यक्ती व 10 संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तथापि, सन 2023-24 या केवळ एक वर्षासाठी 60 व्यक्ती व 10 संस्था असे एकूण 70 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानुषंगाने सन 2023-24 या वर्षांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्री.भाऊ दगडू कांबळे आणि श्रीमती वर्षा सुनिल लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले...

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर फुलली अनोखी बाग..!

Image
ठाणे,दि.24(जिमाका):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यातील 100 दिवस कृती आराखडा तसेच नुकताच जाहीर झालेल्या 150 दिवस कृती आराखड्यांतर्गत शासकीय कार्यालये व त्यांच्या कामकाजाची पद्धत अंतर्बाह्य कात टाकीत आहेत. यातूनच प्रेरणा घेत ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर एक सुंदर, सजीव आणि नाविण्यपूर्ण पर्यावरणस्नेही  “ टेरेस गार्डन ”  तयार झाले आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील या अनोख्या  “ टेरेस गार्डन ”  ची चर्चा सर्वत्र आहे. ही केवळ एक बाग नसून लाकूड, प्लॅस्टिक संसाधनात रूपांतर करणाऱ्या जाणीवेचा एक आदर्श नमुना आहे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून छतावर एक हिरवेगार आणि प्रेरणादायी बगीचा उभा करण्यात आला आहे. या बागेत ट्रेसीना, एलिफंट इयर, स्नेक प्लांट, हेनीकेनी, जास्वंद, लेमन ग्रास आणि 45 प्रकारची विविध झाडे बघायला मिळणार आहेत. ठाण्यातील पर्यावरण तज्ञ विजयकुमार कट्टी या उपक्रमामागची माहिती सांगताना म्हणाले,  “ प्रत्येक वस्तू वापरून फेकण्याऐवजी तिला दुसरं आयुष्य देता येतं, हेच मी या बागेच्या म...

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरतीकरिता दि.01 जुलै ते दि.08 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा

ठाणे,दि.24(जिमाका):-  नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड ’  संवर्गात 284 पदे भरतीकरिता दि.22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दि.22 एप्रिल ते दि.16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यानुसार आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दि.01 जुलै 2025 ते दि.08 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता विभागाकडून कोणतीही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, ...