धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे,दि.31(जिमाका) :- महाराष्ट्र शासन विभागामार्फत राज्यातील ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे सभासद होण्याकरीता शासनाने ऑनलाईन विधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल. सध्या यासाठीचे नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम रुपये 500/- राहील. तसेच वार्षिक सभासद शुल्क रक्कम रुपये 300/- राहिल. शुल्क भरणा करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करावयाचे आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटची https:// ananddighekalyankarimandal.org ही लिंक दिलेली आहे. या लिंकव्दारे ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वरील लिंकव्दारे रिक्षा चालक आणि टॅक्सीचालक सभासद नोंदणीसाठी सोबत जोडलेल्या चार्टप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने...