Posts

Showing posts from October, 2025

नेरुळ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Image
ठाणे,दि.29(जिमाका):-  नेरुळ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे आयोजन ग्रंथालयातर्फे करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रदर्शनात 102 विविध विषयांवरील दिवाळी अंक ठेवले असून, आठवडाभरासाठी आयोजित या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, महापालिका नेरुळ विभाग अधिकारी डॉ.अनुराधा बाबर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, जेष्ठ नागरिक संघाच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, सुनील आचरेकर, रुग्णसेवा केंद्राचे अध्यक्ष रणजीत दीक्षित, सेंट ऑगस्टीन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीरा माने, शब्दालय प्रकाशनाचे सुमित लांडे, लेखक गजानन म्हात्रे, सुभाष हांडे देशमुख, भालचंद्र माने तसेच सेंट ऑगस्टीन हायस्कूल मधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सांस्कृतिक समन्वय विशेषांक शब्दालय - 2025 या दिवाळी अंकाचे ...

विशेष लेख क्र.41: जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26; युवा शक्तीला मिळणार व्यासपीठ

Image
वक्तृत्व, लोककला आणि नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन   राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 या वर्षीपासून दरवर्षी दि.12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे या कार्यालयाद्वारे युवा दिन, युवा सप्ताह व युवा महोत्सव निमित्ताने युवांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हास्तरावर करण्यात येते. त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे जिल्ह्यात युवा महोत्सव आयोजनाबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र/बक्षीस रक्कम दिली जाईल...

विशेष लेख क्र.40: लोहपुरुषा'चे अखंड भारताचे स्वप्न: महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय एकात्मतेची चिरंजीव प्रेरणा

Image
प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांच्याशिवाय त्या राष्ट्राच्या अस्तित्वाची कल्पनाही करणे शक्य नसते. भारताच्या इतिहासातील असेच एक तेजस्वी पर्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि कार्य. 31 ऑक्टोबर 1875 रोजी जन्मलेल्या या महान सुपुत्राची जयंती आपण दरवर्षी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करतो. केवळ एक दिवस म्हणून नव्हे, तर त्यांच्या अलौकिक कार्याची आणि कणखर नेतृत्वाची आठवण ठेवून, त्यांच्या विचारांना कृतीत उतरविण्याचा हा दिवस. विशेषतः महाराष्ट्र राज्यासाठी, ज्याने त्यांच्या जीवनप्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा अनुभवला, त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा आजही तितकीच ज्वलंत आणि मार्गदर्शक आहे. राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व आणि महाराष्ट्राचा संदर्भ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर जी सर्वात मोठी आव्हाने होती, त्यापैकी एक म्हणजे राजकीय आणि भौगोलिक विखंडन. ब्रिटिश राजवटीने भारतात 562 हून अधिक छोटी-मोठी संस्थाने सोडली होती आणि ती स्वतंत्र राहण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत, एकात्म, अखंड आणि मजबूत भारताची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य सरदार वल्लभभ...

ठाणे जिल्ह्यात स्वदेस फाऊंडेशनच्या ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ

Image
ठाणे,दि.29(जिमाका):-  ठाणे जिल्ह्यात स्वदेस फाऊंडेशनच्या विकास कार्याचा शुभारंभ शहापूर येथील शेटे हॉलमध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते मंगळवार, दि.28 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे तसेच स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ संचालक राहुल कटारिया आणि ठाणे जिल्हा व शहापूर तालुक्यातील विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले. त्यानंतर स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक प्रसाद पाटील यांनी ‘स्वप्नातील गाव’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वदेस फाऊंडेशनची ध्येय धोरणे, ‘स्वप्नातील गाव कार्यक्रम’ व आगामी विस्ताराबाबत सांगितले की, ‘स्वप्नातील गाव’ कार्यक्रमात ग्रामविकास समित्या संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कार्य करतात, ज्यामुळे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होतो. या उपक्रमातून रायगड व नाशिक जिल्ह्यात 250 हून अधिक गावे ‘स्वप्नातील गाव’ म्हणू...

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

Image
ठाणे,दि.29(जिमाका):-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे  “ सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ ”  कार्यक्रम मंगळवार दि.09 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून व ध्वजदिन निधी स्विकारून करण्याचे निश्चित झाले आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास मंगळवार, दि.09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे. 00000

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार” योजनेचे अर्ज करण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत

Image
ठाणे,दि.29(जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशास पात्र असून शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने  “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ”  योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज  https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहेत. याल योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि. दि.30 नोव्हेंबर 2025 या मुदतीच्या अगोदर सादर करावेत, तसेच अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि.ठाणे., 400605 या कार्यालयास जमा करावी, असे ठाणे समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित “रन फॉर युनिटी” कार्यक्रमात सहभागी व्हावे

ठाणे,दि.29(जिमाका):-  सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 06:30 वाजता  “ रन फॉर युनिटी ”  हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथून सुरू करण्यात येवून पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त करण्यात येणार आहे.   “ रन फॉर युनिटी ”  कार्यक्रम ठाणे पोलीस आयुक्तालय व ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येणार असल्याने या कार्यक्रमामध्ये ठाणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे. 00000

जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समितीची बैठक संपन्न

Image
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून  जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा  -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ ठाणे,दि.27(जिमाका):-  जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन करण्याकरिता जिल्हास्तर आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा, जास्तीत जास्त युवक-युवतींचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचित केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)   देविदास महाजन, ‎  जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर, सायली दप्तरदार, एनसीसीचे कंपनी कमांडर कॅप्टन बिपीन धुमाळे, नेहरु युवा केंद्राच्या मनिषा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत संचालनालयाच्या परिपत्रकानुसार समिती गठन करण्यास मान्यता प्रदान करणे,   जिल्हास्तर युवा महोत्सवाचे ठिकाण व तारीख निश्चित करणे, युवा महोत्सवाच्या अंदाजपत्रक व खर्चास मान्यता देणे या विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ...

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”

महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा ‑ मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न   ठाणे,दि.27(जिमाका):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली  “ प्रोजेक्ट महादेवा ”  ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा ‑ मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएफए कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी प्रत्येकी 30 मुलगा ‑ मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल, ज्यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल. ही योजना MITRA, क्रीडा विभाग, WIFA, CIDCO आणि VSTF यांच्या सं...

फळपिक विमा योजनेंतर्गत आंबिया बहारातील आंबा फळपिकासाठी सहभागाकरिता 30 नोव्हेंबर अंतिम मुदत

ठाणे,दि.09(जिमाका):-  येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे आंबा फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता दि.30 नोव्हेंबर 2025 अंतिम मुदत आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन आंबा फळबागांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे. योजनेची वैशिष्टे:- ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 ग...