ठाणे जिल्हयात अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.
ठाणे , दि. 27 (जिमाका) :- ठाणे जिल्हयात अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील सर्व जिल्हा नियोजन तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने राज्यात संविधान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ' भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संविधानाबाबतची जागरुकता वाढविणे , विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करणे व नागरिका कर्तव्याविषयी सजगता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या बाबत अल्पसंख्याक विकास विभागाने दि. 19 नोव्हेंबर रोजीचे पत्राने कळविले आहे.त्याअनुषंगाने ठाणे जिल्हयातील शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवावा. युवा करिअर संस्थेद्वारे खालीलप्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 1. मराठी /हिंदी /इंग्रजी भाषांमध्ये प्रश्नमंजुषा 2.ऑनलाइन पद्धतीने जिल्हा व राज्यस्तरापर्यंत ...