शहिदी समागम कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय यंत्रणांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांचा इतिहास समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावा -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शहिदी समागम कार्यक्रम आयोजनाची आढावा बैठक संपन्न
ठाणे, दि.4(जिमाका):- "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर" यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तसेच अशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. नवी मुंबई,खारघर येथील ओव्हल मैदान येथे दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत शहिदी समागमचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आज करण्यात आली. या कार्यक्रमास शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल आणि अन्य सर्व समाजांचे समाजबांधव देखील लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण...