कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणूक -2025 एकूण 58.10 टक्के मतदान 1 लाख 30 हजार 926 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 


ठाणे,दि.03(जिमाका) :- ठाणे जिल्हयातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी  दि.02 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार एकूण 58.10 टक्के मतदान झाले असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

मतदार यादीनुसार कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेमध्ये एकूण 24 प्रभागांमध्ये मतदान झाले. या 24 प्रभागांमध्ये एकूण 1 लाख 17 हजार 653 पुरुष, 1 लाख 7 हजार 686 स्त्री आणि 16 इतर असे एकूण 2 लाख 25 हजार 355 मतदार होते त्यापैकी 68 हजार 257 पुरुष, 62 हजार 667 स्त्री आणि 2 इतर असे एकूण 1 लाख 30 हजार 926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी बातमीसोबत जोडण्यात आली आहे. मतमोजणी रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

000000000

 


 


Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”