प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

 




 

ठाणे,दि.01(जिमाका) :- दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 दरम्यान कंट्रोल चाईल्ड हेल्पलाईन (1098) पुणे येथून 16 वर्षाच्या दोन मुलींचा  बाल विवाह 24 नोव्हेंबर 2025  होणार असल्याच्या  संदर्भात अशी माहिती मिळाली. त्यांचे लग्न उद्या असून आज सायंकाळी 7 वाजता हळद आहे. त्याप्रमाणे त्यांची सविस्तर माहिती मिळविण्यात आली.  याबाबत जिल्हा महिला बाल  विकास अधिकारीजिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना माहिती तातडीने  देण्यात आली असता त्यांनी या संदर्भात संरक्षण अधिकारी आणि सामाजिक संस्था यांची मदत घेण्यास सांगितल्या प्रमाणे त्यांना  कळविण्यात आले. त्याप्रमाणे आपण याबाबत सर्वांना कळवून मुरबाड पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी माहिती  देऊन त्यांच्या मदतीने दिलेल्या ठिकाणी चाइल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयकस्थानिक पोलीस विभाग, पोलीस पाटील, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि  सेवा संस्था यांनी तात्काळ कार्यवाही करण्यास पोहोचलो असता त्या ठिकाणी बालिका घरी नव्हत्या आम्ही जाण्यापूर्वी त्यांनी हळद थांबविली होती. प्रथम आपण त्याच्या पालकांचे  समुपदेशन करून त्यांना असे सांगितले की, आपल्या बालिकेचे वय हे 18 वर्षे पूर्ण नसल्यामुळे आपण तिचा विवाह करू शकत नाही आणि जर तसे झाले असते तर आपणास बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याप्रमाणे त्याच्या पालकांनी संमती दर्शवली कीआम्ही आमच्या मुलीची लग्न 18वर्ष पूर्ण होईपर्यंत लावणार नाही. तसेच यासंदर्भात बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मॅडम यांना फोनद्वारे बालविवाह विषयी माहिती दिली असता त्यांनी फोनवर पालकांशी संवाद साधला पालकांचे व बालकीचे समुपदेशन केले आणि त्यांना बाल कल्याण समिती समोर दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान आणि  भारतभर बालविवाह मुक्त भारत अभियान  सुरु आहे. ही मोहीम 100 दिवसीय असणार आहे. आक्टोंबर  ते 26 जानेवारी 2026 पर्यंत चालू आहे.

अश्या प्रकारे बालविवाह होत (होणार)  असल्यास किंवा बालकांचे शोषण होत असल्यास नागरिकांनी त्वरित 1098 या चाईल्ड हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, असे महाराष्ट्र राज्य पुणे महिला व बाल विकास आयुक्तालय सह आयुक्त राहुल मोरे यांनी कळविले आहे.

00000000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”