ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदीचे आदेश नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
ठाणे,दि.02(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषद (वर्ग-अ) व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद (वर्ग-अ) येथील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मद्यविक्री व वितरणावर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. मतदानपूर्व 48 तास आणि मतमोजणी दिवशी ‘ड्राय डे’ लागू राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
निवडणूक आयोगाने 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान व 03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी जाहीर केली आहे. त्यानुसार मद्यविक्री केंद्रे, दुकानं, बार, रेस्टॉरं
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, बंदीचे उल्लंघन करणाऱ्या परवाना धारकांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 व संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच परवाना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. सर्व अधिकारी व परवानाधारकांनी आदेशाची नोंद घेणे बंधनकारक आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, निवडणूक काळात शांतता, सुव्यवस्था आणि मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता यावे, याकरिता कायद्यानुसार ‘ड्राय डे’ लागू केला जातो. त्यामुळे नागरिकांनी आणि परवाना धारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000000000
Comments
Post a Comment