रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कालवा पाण्याचे नियोजन जाहीर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

 

 

ठाणे,दि.02(जिमाका) :-  ठाणे पाटबंधारे मंडळाअंतर्गत भातसा धरण व्यवस्थापन विभाग, भातसानगर यांनी रब्बी व उन्हाळी हंगाम 2025-26 साठी कालवा पाटीचे (Rotation) पाण्याचे सविस्तर वेळापत्रक, अटी-शर्ती व नियमांची अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे शहापूर, भिवंडी, वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना येत्या हंगामात सिंचनासाठी कोणत्या दिवशी पाणी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती भातसा धरण व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.

सूचनेनुसार लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी खालील महत्त्वाच्या बाबींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे  मंजूर उपसा सिंचन योजनेनुसारच (कालवा/नदी/नाले) पाणी वापरावे. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यामध्ये तनी मीटरचे अंतर असले पाहिजे. अनधिकृत उपसा आढळल्यास तात्काळ पाणी बंद केले जाईल. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35मीटर पर्यंतच्या विहीरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी उदा. ऊसकापूसकेळी व फळबाग इ. प्रवाही सिंचनाच्या मुळ दराच्या 50 टक्के दर लागू असेल.   शेतातून जाणारे पाणी शेजाऱ्याच्या जमिनीत जाणार नाही, अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक. सिंचनासाठी ट्रॅक्टर-टँकर, टँक ऑन व्हील्स वापरण्यास संपूर्ण बंदी. पाण्याचा अपव्यय, अडथळा निर्माण करणे, कालवा मोडतोड, बेकायदेशीर वळण आढळल्यास 20 टक्के दंडासह पाणीपुरवठा तात्काळ बंद होईल. पाणीकपात दिवस व रात्री दोन्ही वेळ लागू राहील. महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन अनिवार्य असेल.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार वेळापत्रक बदलण्याची शक्यता. पाण्याचा साठा कमी झाल्यास किंवा हवामानातील बदलामुळे कालव्यातील पाणी कमी पडल्यास "टेल टू हेड" या पद्धतीने टप्प्याटप्प्याने पाणीकपात लागू केली जाईल. त्याबाबतची सूचना संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कळविण्यात येईल, असेही सूचनेत नमूद केले आहे.

शेतकऱ्यांनी तक्रारी, अडचणी यासाठी सिंचन विभागाशी त्वरित संपर्क साधावा सिंचन शाखा व उपविभागीय कार्यालयांतून शेतकऱ्यांना माहिती, अर्ज, मार्गदर्शन दिले जाणार आहे. पाण्याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्वरित लेखी स्वरूपात कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 कालवा सोडण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल.

रब्बी व उन्हाळी हंगाम 2025-26 कालवा पाण्याची पाटी योजना

 क्र.  कालवा सोडण्याची तारीख                  दिवस              कालवा बंद तारीख                   दिवस

1    ०४/०२/२०२६ ते २७/०२/२०२६                       २२        २८/०२/२०२६ ते ०५/०३/२०२६             

2    ०६/०३/२०२६ ते २८/०३/२०२६                       २२        २९/०३/२०२६ ते ०४/०४/२०२६             

3    ०५/०४/२०२६ ते २७/०४/२०२६                     २२        २८/०४/२०२६ ते ०४/०५/२०२६            

4   ०५/०५/२०२६ ते २७/०५/२०२६                      २२        २८/०५/२०२६ ते  ०३/०६/२०२६            

5   ०४/०६/२०२६ ते २९/०६/२०२६                       २५                    —                                          —

 

एकूण कालवा सोड दिवस : 109 दिवस  एकूण बंद दिवस : 28 दिवस

 

सूचनेनुसार रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कृषी नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी हितावह ठरणार असल्याचे भतसा धरण व्यवस्थापन विभागभातसानगरचे कार्यकारी अभियंता यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

000000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”