महाराष्ट्र राज्यात दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) दि.30 जून पर्यंत बसविण्याचे आवाहन

 



 

 

ठाणे दि.08(जिमाका) :- मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील                        दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचित केले आहे. या बाबतची माहिती व मार्गदर्शन विषय सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरीता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LID., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL https://hsrpmhzone2.in आहे व दि.01 जानेवारी 2025 पासून हे काम सुरु झाले आहे.

मा. परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या परिपत्रकान्वये जुन्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने मा. परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडून दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर दि.01 जुलै 2026 पासून HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न