महसूल विभागात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा द्यावा महसुल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे, दि.१ (जिमाका): महसूल विभागाच्या कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षापासून अधिकारी-कर्मचारी यांच्या जोडीदाराची देखील वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, अर्चना कदम, रोहीत राजपूत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना महसुल दिनाच्या शुभेच्छा देत महसुल विभाग काळानुरूप बदलतोय दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतासोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केले. अध...