Posts

"सेवा संकल्प" अभियानांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा लोकाभिमुख मुरबाड दौरा वैशाखरे येथे आदिवासी भोंडाई महोत्सवाला उपस्थिती; प्रत्यक्ष बांधावर जावून भातपिकांची पाहणी अन् आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला आपुलकीचा संवाद...!

Image
  ठाणे,दि.18(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या "सेवा संकल्प" अभियानांतर्गत प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्याचा ध्यास घेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल दि.17 ऑक्टोबर रोजी मुरबाड तालुक्यात लोकाभिमुख दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य आणि महसूल अशा सर्वच महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाची प्रगती प्रत्यक्ष जाणून घेतली. वैशाखरे येथे पारंपरिक "आदिवासी भोंडाई " महोत्सवाचा उत्साह.. दौऱ्याचा शुभारंभ वैशाखरे येथे आयोजित पारंपरिक आदिवासी भोंडाई महोत्सवाने झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे आणि लोकपरंपरेचे दर्शन घडले. याप्रसंगी जिल्हाधिकारी महोदयांचा बैलगाडीवरून प्रवास तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपारिक नृत्यात स्वतः जिल्हाधिकारी महोदयांचा सहभाग यातून खरोखरीच लोकाभिमुख प्रशासनाचा चेहरा दिसून आला. याप्रसंगी स्थानिक आमदार किसन कथोरे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे तसेच मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांचीही विशेष उपस्थिती ...

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त ठाण्यात 'लोककलेतील श्री गणेश' कार्यक्रमाचे शानदार आयोजन;'bappa.org' मोहिमेचाही नागरिकांना लाभ

Image
    ठाणे,दि.18(जिमाका): गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे 'लोककलेतील श्री गणेश' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत दिमाखदार वातावरणात काल दि.१६ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा वारसा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या विशेष सांस्कृतिक सोहळ्यात २० कलाकारांच्या संचाने पारंपरिक लोककलांचे अप्रतिम सादरीकरण केले. यामध्ये नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर-गोंधळ यांसारख्या महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक लोककलांचा समावेश होता.या विविधरंगी सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिमय व उत्साही वातावरणाने दुमदुमून गेले. सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या 'शेलारमामा फाउंडेशन'च्या समन्वयातून विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने ...

"सेवा संकल्प" अभियानांतर्गत 9 पथकांमार्फत शहापूर तालुक्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचणार महसूल प्रशासन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते घरपोच लाभ वाटप योजनेचा उत्साहात शुभारंभ

Image
      ठाणे,दि.17(जिमाका): नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ थेट त्यांच्या घरापर्यंत सहज आणि विनाविलंब मिळावेत, या मुख्य उद्देशाने राबविल्या जात असलेल्या 'सेवा संकल्प' अभियानांतर्गत घरपोच लाभ वाटप योजनेचा शुभारंभ आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते नुकताच उत्साहात पार पडला.                 या अभियानाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी प्रचार-प्रसिद्धी केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा स्वतः गावागावांत जाऊन नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहे.             'सेवा संकल्प' अभियान हे केवळ एक उपक्रम नसून, ते प्रशासनाला थेट जनतेशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, ७/१२ उतारे व इतर सेवा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने हे विशेष पाऊल उचलले आहे.             या ...

महावितरणचा ‘सेवा संकल्प अभियान’ कायमस्वरूपी अंगीकारण्याचा संकल्प वीजग्राहकांना तत्पर आणि गतिमान सेवा देण्याचे महावितरणच्या अध्यक्षांचे आवाहन

Image
  ठाणे,दि.16 (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ एका महिन्यापुरते मर्यादित न राहता, त्यातील गतिमानता आणि ग्राहकाभिमुख सेवेची संस्कृती महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कायमस्वरूपी अंगीकारावी, असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केल, शुक्रवारी (दि. 15) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात एकाच ठिकाणी सर्व ग्राहकसेवा तसेच विविध योजनांमधील सहभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, वीजग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विविध परिमंडलांचा आढावा आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील 25 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त महावितरणतर्फे प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून येत्या 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी व्हिडिओ कॉन्फर...

ठाणे जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण; दावे व हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे नागरिकांना आवाहन

  ठाणे,दि.16(जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) या उपक्रमांतर्गत सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुधारित मुदतीनंतर अंतिम मतदार यादी पूर्वघोषित वेळापत्रकाप्रमाणेच दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गैरहजर, स्थलांतरित किंवा इतर कारणांमुळे ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकले नाही, त्यांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी मतदार यादीत नव्याने नाव नोंदवण्याची संधी या कालावधीत उपलब्ध झाली आहे. याशिवाय, ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात न आल्याने                  १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नाव नोंदवता आले नव्हते. आता दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार नवमतदार...

शहापूर प्रकल्पातर्फे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 'स्वास्थ्य पोषण सेवा संगम अभियाना'चे आयोजन आदिवासी बांधवांसाठी एकाच छताखाली विविध शासकीय योजना व सेवा उपलब्ध

    ठाणे, दि.16(जिमाका) :- आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'स्वास्थ्य पोषण सेवा संगम अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील चार प्रमुख बहुउद्देशीय केंद्रांवर विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने आरोग्य तपासणी, पोषण जनजागृती, दाखले व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी आणि आदिवासी कल्याण योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. अभियानासाठी निश्चित करण्यात आलेली बहुउद्देशीय केंद्रे हे अभियान ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जु-बेहरे (कातकरी वाडी), म्हसकल-घोडाखडक, राया-कलमवाडी आणि पळसोली-वैतागवाडी या चार बहुउद्देशीय केंद्रांवर आयोजित केले जाणार आहे. या सर्व केंद्रांवर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना थेट सेवा व मार्गदर्शन प्रदान करतील. महिनाभर राबवले जाणारे दिनांकनिहाय उपक्रम अभियानाच्या कालावधीत १५ व १६ ऑक्टोबर र...

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 25 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी पायाभूत साक्षरता व संख्यावान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा आयोजन व पार्श्वभूमी

    ठाणे,दि.16(जिमाका) :- केंद्र शासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील असाक्षर व्यक्तींसाठी रविवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून सुमारे 7 लक्ष परीक्षार्थी प्रविष्ट होणे अपेक्षित आहे. सदर परीक्षेच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (योजना) व त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे स्वरूप, माध्यम व पात्रता ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगू, तामिळ आणि बंगाली अशा एकूण 9 भाषांच्या माध्यमातून घेतली जाईल. या परीक्षेसाठी 15 किंवा अधिक वयाची नोंदणीकृत अस...