विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

 



ठाणे,दि.8(जिमाका) :- मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, कौसा, मुंब्रा, ठाणे येथे दि.२२ जुलै ते ०८ ऑग.२०२६ या कालावधीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील नवयुवकांकरीता  सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  या भरती मेळाव्यासाठी  विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्याने ते उपलब्ध करुन देणाऱ्या कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत.  तसेच इच्छूक कंत्राटदारांकडून या कार्यालयास निविदा प्राप्त होण्याची  अंतिम दि.१८ जुलै २०२६ आहे.

याबाबत इच्छुक कंत्राटदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्र.०२२-४५६४१५९३/

९९२००१६५८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी केले आहे. 

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन