राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ‘डीएव्ही’च्या देव व ऊर्वीला पदक
ठाणे,दि.30(जिमाका) :- येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुनिलकुमार देव सिंग याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात रजत; तर मुलींच्या गटात ऊर्वी जगदीश मोरे हिने कांस्यपदक पटकविले. जिल्हास्तरीय आणि विभागीय निवड चाचणी स्पर्धेद्वारे या दोघांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत देव आणि ऊर्वीने आपापल्या वयोगटात ट्रॅडिशनल, रिदमिक आणि आर्टिस्टिक प्रकारात प्रत्येकी तीन सुवर्ण पदके पटकविली होती. त्यानंतर वसई येथे झालेल्या मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धेत देवने ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टिक प्रकारात दोन सुर्वर्ण पदके प्राप्त केली होती; तर ऊर्वीने आर्टिस्टिक प्रकारात सुर्वण आणि ट्रॅडिशनल प्रकारात कांस्यपद पटकविले होते. त्यामुळे या दोघांची छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीड...