ठाणे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अभ्यासक्रमनिहाय / विषयनिहाय तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातांची (Visiting Lecturer) आवश्यकता
ठाणे,दि.26(जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे या संस्थेत शैक्षणिक वर्ष
2025-2026 च्या सम सत्राकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अभ्यासक्रमनिहाय / विषयनिहाय
तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातांची (Visiting Lecture) आवश्यकता आहे. तरी इच्छुक
व पात्र उमेदवारानी दि.29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन,
ठाणे येथे संबंधीत विभागात शैक्षणिक मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे.
उमेदवारांनी संबंधित विषयाचे सादरीकरण व मुलाखतीच्या तयारीने उपस्थित
राहावे. तसेच सोबत स्वतःचा बायोडेटा, मूळ शैक्षणिक कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकित
प्रतींचा एक संच सोबत ठेवावा. निवड केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक भारापोटी संद्धांतिक
तासिकेस रूपये 800/- प्रति तास व प्रात्यक्षिक तासिकेस रू.400/- प्रति तास या दराने
मानधन देय राहील.
जाहिरात निव्वळ तासिका तत्वावर नियुक्तीसाठी असल्यामुळे भविष्यात
नियमित नियुक्तीचा कुठलाही न्यायालयीन दावा करता येणार नाही. तसेच नियुक्तीपूर्वी उमेदवारांना
विहीत नमुन्यातील अटी व शर्ती मान्यतेचे हमीपत्र भरून द्यावे लागेल.
विभाग/विषय :- 1. स्थापत्य अभियांत्रिकी, 2. उपयोजीत यंत्रशास्त्र,
3. विद्युत अभियांत्रिकी, 4. संगणक अभियांत्रिकी, 5. माहिती व तंत्रज्ञान, 6. रसायन
अभियांत्रिकी, 7. प्रवास व पर्यटन, 8. अणुविद्युत्त
अभियांत्रिकी, 9. यंत्रअभियांत्रिकी.
किमान शैक्षणिक अर्हता :- अभियांत्रिकीचे संबंधीत शाखेतील
प्रथम श्रेणीतील पदवी.
विभाग/विषय :- 1. रसायनशास्त्र, 2. गणित (विज्ञान व मानव्य विभाग).
किमान शैक्षणिक अर्हता :- संबधीत विषयातील प्रथम श्रेणीतील
पदव्यूत्तर पदवी, असे ठाणे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय रो.महाजन
यांनी कळविले आहे.
0000000000000000
Comments
Post a Comment