Posts

Showing posts from September, 2026

क्रीडा ई - प्रमाण" (Krida e-Pramaan) नोंदणी व लॉगिन मार्गदर्शन

        ठाणे,दि.29(जिमाका) : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडुंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीमध्ये 5 टक्के खेळाडु आरक्षण क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी आणि पडताळणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी, अदयावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ब्लॉकचेन आधारित "क्रीडा ई - प्रमाण" प्रणालीचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.08 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रणालीनुसार ज्या खेळाडुंना प्रमाणपत्रांची पडताळणी करुन घ्यावयाची आहे, त्यांनी खालीलप्रमाणे विहीत कार्यपद्धतीची अंमलबजावणी करावी. सर्वप्रथम https://sports.maharashtra.gov.in/   या क्रीडा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. या पृष्ठावरील "माझ्या सेवा" हा पर्याय निवडुन 5% आरक्षण या सेवेमध्ये जावे. या सेवेमध्ये Register here वर क्लिक करुन नोंदणी प्रक्रिया सुरु करावी. या नोंदणी प्रक्रियेमध्ये आवश्यक ती वैयक्तिक माहिती अचूक भरावी. आपला वैयक्तिक ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या O...

"रोजगार महाकुंभ 2026" ठाणे जिल्ह्यात 43 ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन

Image
    ठाणे,दि.29(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत "युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती" या संकल्पनेला अनुसरून ठाणे जिल्ह्यात भव्य "रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह" (रोजगार महाकुंभ) चे आयोजन करण्यात आले. या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत कोकण विभागात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तब्बल 224 ठिकाणी रोजगार मेळावे होत असून, ठाणे जिल्ह्यात 43 ठिकाणी ‘रोजगार महाकुंभा ’ चा शुभारंभ करण्यात आला.             यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,  जिल्हा रोजगार व कौशल्य विकास अधिकारी रविंद्र मोरे व अन्य मान्यवरांसह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.             कोपरी येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ रोजगार प्रशिक्षण केंद्रात आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांनी या सुवर्णस...

अंबरनाथमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी भव्य दाखले वाटप शिबिर संपन्न एकाच छताखाली शेकडो लाभार्थ्यांना मिळाला शासकीय आधार!

Image
  ठाणे,दि.28(जिमाका): विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे आणि तहसील कार्यालय महसूल विभाग,अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ रोटरी क्लब येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधवांसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विशेष शिबिर आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार अमित पुरी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले.             शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत,त्यातही विशेष करून विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधवांसाठी सहज, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पोहोचावा, या उदात्त उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळाला.          ...

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’ 27 ठिकाणी होणार थेट रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह

    ठाणे, दि.28(जिमाका) : "युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती" या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी कोकण विभागात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 230 ठिकाणी भव्य ‘रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह’ आयोजित करण्यात आले आहेत. या राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून, ठाणे जिल्ह्यात एकूण 27 प्रमुख केंद्रांवर सकाळी 10.00 वाजता या ‘रोजगार महाकुंभाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील गरजू, सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरीइच्छुक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात नियोजित 27 रोजगार मेळाव्यांची केंद्रे खालीलप्रमाणे आहेत: 1) ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशन, ठाणे बेलापूर हायवे, रबाळे, नवी मुंबई. 2) तकीया अमानी शहा, प्रा. आयटीआय, 654 ईदगाह रोड, भिवंडी. 3) लाईट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे. 4) शिवानंद मित्र सामाजिक संस्था, साकेत कॉलेज, साकेत विद्यानगरी मार्ग, चिंचपाडा रोड, काटेमानिवली, कल्याण. 5) पाताली शि...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी केले महत्वपूर्ण मार्गदर्शन

Image
    ठाणे,दि.28(जिमाका): राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी  28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर 'आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 28 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्र.नायब तहसिलदार सुरेश महाला, निवासी नायब तहसिलदार विशाल इंदूलकर, स्वप्निल मुणगेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             याप्रसंगी माहितीचा अधिकार कायद्याला 21 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कायद्याची प्रमुख उद्दिष्टे, महत्त्वाच्या बाबी, माहिती पुरविण्याची जबाबदारी आणि अर्जदारांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता याबद्दल सविस्तर माहिती दिली. शासन निर्णय क्रमांक केमाअ- २००८/ प्र....

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे येथे कामगार नेते आणि मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांची 93 वी जयंती साजरी

Image
    ठाणे, दि.28(जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे येथे मराठा आरक्षणाचे आद्यप्रणेते, कामगार नेते आणि मराठा क्रांतीसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 93 वी जयंती मोठ्या उत्साहात व आदराने साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित विशेष चर्चासत्रात स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर, विशेषतः कामगारांचे हक्क आणि मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा व ध्येयाचा वारसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे  कर्मचारी आणि...

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत कोरम मॉलमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण शिबिर संपन्न

Image
    ठाणे, दि.28(जिमाका): मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमातंर्गत 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातर्गत दि.26 सप्टेंबर   रोजी कोरम मॉल येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.             मतदार नोंदणी अधिकारी श्री. सर्जेराव मस्केपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव हे देखील उपस्थित होते.             या भेटीदरम्यान डॉ.पांचाळ यांनी शिबिरात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित नागरिकांना मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करत मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.             या शिबिरात नागरिकांच्या सोयीसाठी विविध आवश्यक फॉर...

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’ 37 ठिकाणी होणार थेट रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह

    ठाणे, दि.27(जिमाका) : "युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती" या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी कोकण विभागात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 230 ठिकाणी भव्य ‘रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह’ आयोजित करण्यात आले आहेत. या राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून, ठाणे जिल्ह्यात एकूण 37 प्रमुख केंद्रांवर सकाळी 10.00 वाजता या ‘रोजगार महाकुंभाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील गरजू, सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरीइच्छुक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात नियोजित 37 रोजगार मेळाव्यांची केंद्रे खालीलप्रमाणे आहेत: 1) ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशन, ठाणे बेलापूर हायवे, रबाळे, नवी मुंबई. 2) तकीया अमानी शहा, प्रा. आयटीआय, ६५४ ईदगाह रोड, भिवंडी. 3) लाईट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे. 4) शिवानंद मित्र सामाजिक संस्था, साकेत कॉलेज, साकेत विद्यानगरी मार्ग, चिंचपाडा रोड, काटेमानिवली, कल्याण. 5)...

दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Image
            ठाणे,दि.27 (जिमाका) : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थती जाहिर केली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य शासन मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक यांनी आज मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने गडकरी रंगायतन येथे 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा' तथा 'मराठवाडा मित्र आणि मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळयात केले.             यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, पद्मश्री श्रीरंग लाड, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मराठवाडा जन विकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, 'लोकमत'चे संपादक अतुल कुलकर्णी, डॉ.मुकुंद अडसूळ, डॉ.मंगेश कराड, जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.             याप्रसंगी 'मराठवा...

माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार 3 हजार घरे वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Image
  <   ठाणे,दि.25(जिमाका): माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.     कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील ५० वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास मंचावर वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हा...

"शिव समर्थ गणेशोत्सव" आणि "विघ्नहर्ता गणेशोत्सव" मंडळाच्या व्यासपीठावरून घडला अविस्मरणीय "लोकसंवाद" विविध प्रशासकीय विभागांच्या एकसंध 'टीमवर्क'मधून शेती, रोजगार, पर्यावरण व महिला-बालकल्याण योजनांचा थेट जागर

Image
    ठाणे,दि.24(जिमाका) : समाजप्रबोधन आणि प्रशासकीय पारदर्शकता एकत्र आणीत सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ‘लोकसंवाद ’ हा अभिनव उपक्रम अंबरनाथ शहरात मोठ्या दिमाखात पार पडला.             जिल्हा प्रशासन, माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या दूरदर्शी व कुशल मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोकसंवाद उपक्रमात विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांनी गणेश मंडपात थेट नागरिकांशी आत्मीय संवाद साधला. प्रशासनाने स्वतः लोकांच्या दारात येऊन राबविलेल्या या आदर्श ‘टीमवर्क ’ मुळे उपस्थित भाविक, महिला आणि युवकांनी मनापासून समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.             कार्यक्रमाची सुरुवात करताना जिल्हा माहिती अधिका...

कोपरखैरणेत ‘इच्छापूर्ती’ व ‘सुखकर्ता’च्या दरबारात ‘लोकसंवाद’चे प्रभावी पर्व जिल्हा माहिती कार्यालय, अग्रणी बँक, कौशल्य विकास, पोलीस व महिला-बालविकास यंत्रणेच्या ‘टीमवर्क’चे नागरिकांकडून भरभरून कौतुक

Image
  ठाणे,दि.24(जिमाका) : सार्वजनिक गणेशोत्सवाची सामाजिक ऊर्जेची परंपरा जपत शासकीय योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा एक अत्यंत गतिमान व परिणामकारक उपक्रम नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे प्रत्यक्षात उतरला. जिल्हा प्रशासन, माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत असलेले ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास विभाग, पोलीस विभाग आणि ठाणे जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकसंवाद ’ अभियानाने कोपरखैरणे परिसरातील दोन प्रमुख गणेशोत्सवांमध्ये यशस्वी दुहेरी कार्यक्रम संपन्न झाले.             जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कुशल व दूरदर्शी मार्गदर्शनाखाली हा व्यापक प्रबोधनपर उपक्रम पार पडला. एकाच छताखाली विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत साधलेल्या या संवादाने नागरिकांना शासकीय योजनांचे कवच आणि समृद्धीची नवी दिशा दाखवली असून, दोन्ही ठिकाणी भाविक, स्थानिक रहिवासी आणि महिला वर्गाने या अनोख्या प्रयत्नाबद्दल मनस्वी समाधान व्यक्त क...