जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत कोरम मॉलमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण शिबिर संपन्न

 




 

ठाणे, दि.28(जिमाका): मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमातंर्गत 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातर्गत दि.26 सप्टेंबर  रोजी कोरम मॉल येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

            मतदार नोंदणी अधिकारी श्री. सर्जेराव मस्केपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव हे देखील उपस्थित होते.

            या भेटीदरम्यान डॉ.पांचाळ यांनी शिबिरात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित नागरिकांना मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करत मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

            या शिबिरात नागरिकांच्या सोयीसाठी विविध आवश्यक फॉर्म्स (अर्ज) उपलब्ध करून देण्यात आले होते.

            या कार्यक्रमास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. पुरुषोत्तम थोरात, निवडणूक नायब तहसीलदार श्री. संजय साळुंके, श्री. हरून शेख तसेच बी.एल.ओ. भानुदास कंटे व सौ. हर्षदा खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कोरम मॉलसारख्या सार्वजनिक व मध्यवर्ती ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरामुळे नागरिकांना थेट व सुलभतेने मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली.

00000000

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट