दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली
कर्तव्यदक्ष , शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ ठाणे , दि.30(जिमाका):- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे , निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष , शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे , अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील , निवासी उपजिल्हाधिकारीप डॉ.संदिप माने , उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने , उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड , उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील , प्रांताधिकारी उर्मिला पाटील , जिल्हा नियोजन अध...