महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 पेपर क्र.1 व पेपर क्र.2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर

 



 

ठाणे,दि.19(जिमाका) :- शासन निर्णय दि.23 ऑगस्ट, 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेचे आयोजन रविवार दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 पेपर क्र.1 व पेपर क्र.2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.12 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

तरी पेपर क्र.1 व पेपर क्र.2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल दि.16 जानेवारी 2026 रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/परीक्षार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6.00 वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दि.16 जानेवारी 2026 ते दि.21 जानेवारी 2026 रोजी सांयकाळी 6.00 वाजे पर्यंत उमेदवार/परीक्षार्थींना लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार/परीक्षाथीनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न