Posts

Showing posts from July, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती

    ठाणे,दि. 16 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) या महामंडळामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी / विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी जिल्ह्यातील प्रथम ०१ ते ०३ किंवा ०५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. त्या अनुषंगाने मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थींनी दि.२८जुलै २०२६ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भव...

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित मुलांचे शासकीय वसतिगृह कल्याण येथे प्रवेश सुरु

  ठाणे,दि.16(जिमाका ) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित मुलांचे शासकीय वसतिगृह, कल्याण, जि. ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 12 वी नंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. इमाव, विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनां मोफत निवास, तसेच भोजन भत्ता, निर्वाह भत्ता असा आर्थिक लाभ देखील देण्यात येतो. ठाणे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून, अधिक माहिती ठाणे येथील सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, ४ था मजला दत्तवाडी, कळवा जि. ठाणे या कार्यालयात उपलब्ध आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी कळविले आहे. 0000000000

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर

    ठाणे, दि. 16 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचा 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६' घोषित करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील मतदारांना नाव नोंदणी, दुरुस्ती व इतर तांत्रिक बाबींमध्ये सुलभता आणि मार्गदर्शन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व १९ विधानसभा मतदारसंघांनिहाय विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहेत.                  या संदर्भातील सर्व अधिकृत संपर्क क्रमांक आणि वेळापत्रक निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.             घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी जाऊन पडताळणी व भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर २९ जुलै २०२६...

ठाणे जिल्ह्यात ‘माय भारत’ उपक्रमाला गती युवक नोंदणी व स्वयंसेवा अभियानावर विशेष भर

Image
    ठाणे, दि.16(जिमाका) : भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या 'MY Bharat' (मेरा युवा भारत) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा सल्लागार समितीची (DAC) महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यातील युवक नोंदणी वाढवणे, विविध स्वयंसेवा उपक्रम राबवणे आणि वर्ष २०२६-२७ या कालावधीसाठीच्या सर्वसमावेशक कृती आराखड्यावर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला ठाणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी संदीप जिजाबाई लालजी पाटील, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, प्रकल्प संचालक कार्यालयातील प्रतिनिधी बाचोटीकर मुनिर, एनसीसीचे नोडल ऑफिसर कॅप्टन बिपीन एस. धुमाल, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविंद्र स. मोरे, रेडक्रॉसचे प्रतिनिधी आर. ए. कडवे, ठाणे असिस्टंट स्किल डेव्हलपमेंट ऑफिसचे माहिदीपसिंग चौहान, स्काऊट अँड गाईड ठाणे येथील हेमांगी सुनील पाटील, ठाणे लीड बँकेचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर अभिषेक पवार तसेच ठाणे एन.एस...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह व 'स्वयम्' योजनेचे प्रवेश ऑनलाइन सुरू शहापूर प्रकल्पांतर्गत 12 वसतीगृहांचा समावेश, अर्ज करण्याचे जाहीर आवाहन

    ठाणे,दि.8(जिमाका) :-   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर (ता. शहापूर, जि. ठाणे) यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण 12 शासकीय आदिवासी वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षासाठीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. यामध्ये 9 मुलांची व 3 मुलींची शासकीय वसतीगृहे समाविष्ट असून, पात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन भरावेत, असे जाहीर आवाहन प्रकल्प कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.                  राज्यातील विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वसतीगृह योजना राबविली जाते. तसेच, विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना' (सन 2016-17 पासून) लागू करण्यात आली आहे.      ...

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

  ठाणे,दि.8(जिमाका) :- मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, कौसा, मुंब्रा, ठाणे येथे दि.२२ जुलै ते ०८ ऑग.२०२६ या कालावधीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील नवयुवकांकरीता   सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.   या भरती मेळाव्यासाठी   विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्याने ते उपलब्ध करुन देणाऱ्या कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत.   तसेच इच्छूक कंत्राटदारांकडून या कार्यालयास निविदा प्राप्त होण्याची   अंतिम दि.१८ जुलै २०२६ आहे. याबाबत इच्छुक कंत्राटदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्र.०२२-४५६४१५९३/ ९९२००१६५८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.   000000000

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजना

    ठाणे,दि.8(जिमाका) :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व महामंडळाच्या इतर तेरा उपकंपन्या मार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता इतर मागासप्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे ठाणे जिल्ह्याकरीता भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन योजनांमध्ये 20% बीज भांडवल योजना व 1.00 लक्ष पर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान 500असणे बंधनकारक आहे. सर्व ऑनलाईन योजनांसाठी सर्वप्रथम महामंडळांच्या www.msobcfdc.org   या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. अर्जदाराने स्वतःच्या जातप्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार लागू असलेल्या महामंडळाच्या उपकंपनीमध्ये जाऊन आवश्यक ती योजना निवडावी. तद्नंतर अर्जदाराने महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या PDF सुस...

ठाणे जिल्हा क्रीडा पुरस्कार करिता अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांचे आवाहन

  ठाणे,दि.7(जिमाका) :   जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. सन 2024- 25 व २०२५-२६ या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारामध्ये प्रत्येक विजेत्याला रुपये दहा हजार, प्रमाणपत्र, आणि सन्मानचिन्ह असे बक्षिस दिले जाणार आहे. सन २०२४-२५ या वर्षाचे पुरस्काराकरिता 1 जुलै 2020 ते 30 जून 2025 पर्यंतची कामगिरी   तर सन 2025-26 करिता 1 जुलै 2021 ते 30 जून 2026 पर्यंतची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गुणवंत खेळाडू पुरस्काराकरिता संबंधित जिल्ह्यांमध्ये खेळाडूंनी लगतपूर्व पाच वर्षांपैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे (ठाणे जिल्ह्याचे) मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिध्व केलेले अस...

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग बहारातील चिकू फळपिकासाठी सहभागाकरिता 14 जुलै 2026 अंतिम मुदत

  ठाणे,दि.7(जिमाका) :   सन २०२६-२७ करिता मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता ३० जून २०२६ अंतिम मुदत होती. तरी सदरील योजनेत सहभागी होणेसाठी केंद्र शासनाने १४ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिलेली असून जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून चिकू फळबागांचे संरक्षण करण्यासाठी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. रामेश्वर पाचे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे यांनी शेतक-यांना केले आहे. योजनेची वैशिष्टे :- 1) ठाणे जिल्ह्यामध्ये चिकू पिकाकरीता अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव हे महसूल मंडळ अधिसूचित असून त्या महसूल मंडळातील चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. 2) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. 3) खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही या योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीनें शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्...
  शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२ 6 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 3 १ जुलै , 202 6   ठाणे,दि.7(जिमाका) :   येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा उत्पादनावर विपरीत   परिणाम करणाऱ्या बाबीमुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये आलेली   घट गृहीत धरून विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगाम 202 6 करिता सहभागाची अंतिम मुदत दि. 3 १ जुलै , 202 6 अशी आहे .           योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवणे गरजेचे आहे.   पिक विमा नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. कोकण विभागाकरीता शेतकरी सहभागासाठी किमान ...

सेवायोजन कार्यालय रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे कायदा, १९५९ व नियम १९६० अन्वये - मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना - ईआर-१ मध्ये विहित मुदतीत दि.३१ जुलै २०२६ अखेर पर्यंत सादर करण्याचे आहवान

      ठाणे,दि.7(जिमाका) :    ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना याव्दारे अवगत करण्यात येते की, सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्या कलम ५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम ५ (२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / महिला व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतुदींनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in   या संकेतस्थाळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जुलै २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर - १ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाव्दारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून १००% प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव या सर्व आस्थाप...

सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातील पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन

    ठाणे,दि.7(जिमाका) :    महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्याचे युवा धोरण- २०१२ अंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक युकयो- २०१२/प्र.क्र.६५/क्रीयुसे-३, दि.१२ नोव्हेंबर २०१३ अन्वये राज्यातील युवक-युवती तसेच युवक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार व राज्य युवा पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातील पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराचा उद्देश युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे, राष्ट्रनिर्माण व समाजोपयोगी कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव करणे तसेच इतर युवकांना प्रेरणा देणे हा आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट एक युवक, एक युवती आणि एक संस्था यांची निवड करण्यात येणार असून, युवक व युवती यांना प्रत्येकी रु.10 हजार, संस्थेस रु.50 हजार रोख पारितोषिक, गौरवपत्...

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेचा धडाका थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचले जिल्हाधिकारी..!

Image
    ठाणे,दि.2(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, १४७ -कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने कमालीची गती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम. वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचली असून, नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘Enumeration Form’ (गणना अर्ज) वाटप करण्यात येत आहे.             या मोहिमेला नागरिकांकडून कमालीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.             या महत्त्वपूर्ण प्रसंगी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम ...