सेवायोजन कार्यालय रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे कायदा, १९५९ व नियम १९६० अन्वये - मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना - ईआर-१ मध्ये विहित मुदतीत दि.३१ जुलै २०२६ अखेर पर्यंत सादर करण्याचे आहवान

 


 


 

ठाणे,दि.7(जिमाका) :  ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना याव्दारे अवगत करण्यात येते की, सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्या कलम ५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम ५ (२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / महिला व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतुदींनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थाळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार जुलै २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर - मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाव्दारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून १००% प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थाळावर लॉगिन करावे व आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे, तसेच प्रत्येक आस्थापनेने आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावा. असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, सहायक आयुक्त संध्या स. साळुंखे, ठाणे यांनी केले आहे.

या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने कोषागार कार्यालय नेताजी सुभाशचंद्र बोस मार्ग, ठाणे-४००६०१ दुरध्वनी क्र. ०२२२५४२८३०० प्रत्यक्ष किंवा ई-मेल आयडी thanerojgar@gmail.com  यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात यईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम