सन 2025 करिता विविध कृषी पुरस्कारासाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ
ठाणे , दि.31(जिमाका):- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी , महिला , व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न , वसंतराव नाईक कृषिभूषण , जिजामाता कृषिभूषण , वसंतराव नाईक शेतीमित्र , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी , उद्यान पंडित पुरस्कार , कृषिभूषण (सेंद्रिय शेती) , युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपालांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते. यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करणेसाठी होणारा त्रास व लागणारा खर्च यामुळे सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीक...