ठाणे जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना मिळणार 'बुस्टर डोज'
वाधवाणी फाउंडेशनसोबत जिल्हा उद्योग केंद्राचा पुढाकार
ठाणे,दि.24(जिमाका): महाराष्ट्र राज्य परिवर्तन संस्था (MITRA) आणि
वाधवाणी फाउंडेशन यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील
सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचे (MSME)
सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या
उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवडक उद्योगांची वार्षिक उलाढाल पाच पटीने वाढवण्याचे
उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेतला
आहे.
उद्योगांच्या
विकासासाठी तंत्रज्ञानाची जोड..
4 मार्च 2026
रोजी 'मित्रा' (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी
यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार, कौशल्य विकास, उद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित
नवोन्मेषाद्वारे रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे. या भागीदारीमुळे सन 2030
पर्यंत राज्यातील सुमारे 10 हजार व्यवसायांना प्रगतीसाठी थेट मदत मिळणार आहे.
वार्षिक उलाढाल
500 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट तर 1500 उद्योगांची होणार निवड...
या योजनेचे
मुख्य आकर्षण म्हणजे 5ते 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म व लघु
उपक्रमांची क्षमता वृद्धी करणे. फाउंडेशनच्या तांत्रिक आणि धोरणात्मक साहाय्याने
या उद्योगांची वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपयांपर्यंत नेण्यासाठी विशेष प्रयत्न
केले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अशा 1 हजार 500
इच्छुक उपक्रमांची निवड करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
जिल्हा उद्योग
केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ठाणे
जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या कार्यक्षेत्रातील पात्र उद्योगांची माहिती
संकलित करण्यात येत आहे. यासाठी संबंधित उद्योजकांनी https://docs.google.com/spreadsheets/d/1KNzwQkkVYA6wm0Ps0TUeHFfsdnY5uTB
yxuCqYDhNfRk/edit?usp=sharing या
गुगल स्प्रेडशीटमध्ये आपली माहिती त्वरित भरावयाची आहे.
या उपक्रमामुळे
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित असून, स्थानिक
उद्योजकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची दारे खुली होणार आहेत.
00000
Comments
Post a Comment