Posts

Showing posts from April, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    ठाणे,दि.29(जिमाका) :- महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण शुक्रवार, दि.01 मे 2025 रोजी पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे सकाळी 08 वाजता उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. 000000000  

ठाणे जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयामार्फत खाजगी भूकरमापक सेवांसाठी ई-निविदा प्रसिद्ध

              ठाणे, दि.29 (जिमाका) : जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या प्रशासकीय मान्यतेन्वये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे या कार्यालयामार्फत ठाणे जिल्ह्यातील भूमापन व संबंधित तांत्रिक कार्य सुरळीत व परिणामकारक रीतीने पार पाडण्यासाठी करार पद्धतीने संस्थेकडून खाजगी भूकरमापक सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी महा-टेंडर पोर्टलवर Tender ID : 2026_ SCDLR_1298696_1 अन्वये ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.             या निविदा प्रक्रियेस जास्तीत जास्त पात्र व इच्छुक संस्थांकडून स्पर्धात्मक प्रतिसाद प्राप्त व्हावा, तसेच निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, स्पर्धात्मकता व प्रशासकीय कार्यक्षमता अबाधित राहावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख ठाणे नितीन पाटील यांनी केले आहे. 000000000000

फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन

      ठाणे, दि.29 (जिमाका) : राज्यात दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये एकूण १.७१ कोटी खातेदार संख्या असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत. ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे इ.) प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींना आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी   आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास खालील हेल्...

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

    ठाणे, दि.29 (जिमाका): भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'जनगणना २०२७ ' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणना कामासाठी आजपासून जिल्ह्यातील नऊ चार्ज अधिकारी कार्यालयांमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.             या सलग सत्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या संपूर्ण डिजिटल कार्यपद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया कशी पार पाडायची, याचे धडे दिले जात आहेत.             यावेळच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे पूर्णपणे 'डिजिटल' असणे.प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांना विशेष मोबाईल ॲपचा वापर, क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नावलीचे सुलभीकरण, हाउस लिस्टिंग ब्लॉकची (HLB) अचूक रचना आणि संकलित केलेल्या माहितीची गोपनीयता व सुरक्षितता यांसारख्...

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले मॅपिंग करावे मतदार नोंदणी अधिकारी यांचे आवाहन

  ठाणे,दि.28(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतातील 9 राज्य व 3 केंद्रशाशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रम पार पडला आहे. पुढील टप्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. यापूर्वी मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 2002 मध्ये राबविण्यात आलेला होता. सद्य:स्थितीमध्ये या कार्यक्रमातंर्गत पूर्वतयारीचा भाग म्हणून सन 2002 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदारयादीतील नाव असणाऱ्या मतदारांशी सध्याच्या यादीत असलेल्या मतदारांच्या नावाची मॅपींग (Mapping) करण्याची कार्यवाही 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरु आहे. त्यानुषंगाने सध्याच्या मतदार यादीत असलेल्या सर्व मतदारांचे सन 2002 मधील मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग (Mapping) करणे आवश्यक आहे.             सन 2002 नुसार विधानसभा मतदारसंघाचे नाव - 53 ठाणे, मतदार केंद्रांची संख्या - 15, मतदारांची संख्या - 17403...

नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा हक्क दिन' मोठ्या उत्साहात साजरा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

Image
  ठाणे, दि.28(जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी २८ एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                   यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. क्यूआर कोडद्वारे सेवांची माहिती आता अधिक सुलभ..             याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते विशेष 'क्यूआर कोड'चे अनावरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ३७ विभागांनी आपापल्या कार्यालयांच्या दर्शनी भागात हे क्यूआर कोड लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषतः महसूल विभागाच्या सर्व सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयांत हे कोड उपलब्ध होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक कागदपत्रे आणि आपल्य...

डेअरी आणि चीज ॲनालॉगच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

    ठाणे,दि.28(जिमाका):- अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य जनतेला सकस आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात जगात अग्रेसर असून भारतीय आहारामध्ये पनीरला विशेष महत्त्व आहे. चविष्ट असण्यासोबतच पनीर हे प्रथिने, कॅल्शियम आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्याने शाकाहारी लोकांसाठी ते पोषणाचा एक उत्तम स्रोत मानले जाते. मात्र, अलीकडे बाजारपेठेत 'पनीर' आणि 'चीज' यांच्या नावाखाली ' ॲनालॉग' पदार्थांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. मुळात पनीर हा केवळ दुधापासून बनवलेला पदार्थ असतो, तर दुसरीकडे 'डेअरी ॲनालॉग' हे दूध सोडून इतर खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवले जाते, जे केवळ पनीरसारखे दिसते पण प्रत्यक्षात पनीर नसते.         अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि फास्ट फूड विक्रेते अन्न तयार करताना मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करतात, परंतु ग्राहकांना त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. यामुळे ग्राहकांची फस...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

  ठाणे, दि.26(जिमाका) :- भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी सं...

ठाणे जिल्ह्यातील लाखो गोरगरिबांच्या घरांना मिळणार हक्काची जमीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला अतिक्रमण नियमितीकरणाच्या कामाला वेग

Image
    ठाणे, दि. २७ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा गोरगरिबांना न्याय देणारा ऐतिहासिक क्रांतिकारी बदल ठरणार असून, या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अतिक्रमण आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून या योजनेचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र काम करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाने २५ मार्च २०२६ रोजी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाकांक्षी असून, सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले....

'मिशन भरारी’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे आभाळाशी नाते ‘सायन्स सोल्जर्स’ घडवण्याचा संकल्प - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ‘ मिशन भरारी ’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा     ठाणे, दि.27(जि.प. ठाणे) : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी ’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, दि. २७ एप्रिल, २०२६ रोजी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. हा शुभेच्छा समारंभ जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ मिशन भरारी ’ हा केवळ उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा एक व्यापक प्रयत्न आहे. आपल्या मातीतल्या लेकरांना आभाळाशी नाते जोडण्याची ही संधी आहे. अल्पावधीत, केवळ तीन महिन्यांत हा उपक्रम प्रत्यक्षात उतरविणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे. पूर्वी सरकारी कामांना विलंब होत असल्याची धारणा होती; मात्र आज शासनाच्या कार्यपद्धतीत वेग आणि परिण...

ठाणे जिल्ह्यात 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' मोहिमेचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

Image
    ठाणे दि.27(जिमाका) :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. याबैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, शिधावाटप उपनियंत्रक भास्कर तायडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर ...

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ठाणे दि.27(जिमाका):- खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक २०२६-२७ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागाने आखलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,...

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे निर्देश

      ठाणे,दि.23(जिमाका) :- राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले   आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, •         पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. •         शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाण...