146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले मॅपिंग करावे मतदार नोंदणी अधिकारी यांचे आवाहन
ठाणे,दि.28(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतातील
9 राज्य व 3 केंद्रशाशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाच्या
(Special Intensive Revision- SIR) कार्यक्रम पार पडला आहे. पुढील टप्यात महाराष्ट्रासह
अन्य राज्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. यापूर्वी मतदारयादीचा
विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 2002 मध्ये राबविण्यात आलेला होता. सद्य:स्थितीमध्ये या
कार्यक्रमातंर्गत पूर्वतयारीचा भाग म्हणून सन 2002 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या
मतदारयादीतील नाव असणाऱ्या मतदारांशी सध्याच्या यादीत असलेल्या मतदारांच्या नावाची
मॅपींग (Mapping) करण्याची कार्यवाही 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरु आहे. त्यानुषंगाने सध्याच्या मतदार
यादीत असलेल्या सर्व मतदारांचे सन 2002 मधील मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग
(Mapping) करणे आवश्यक आहे.
सन 2002 नुसार विधानसभा मतदारसंघाचे नाव - 53 ठाणे, मतदार
केंद्रांची संख्या - 15, मतदारांची संख्या - 17403.
सन २०२५ नुसार दि.
२५ एप्रिल २०२६ रोजी मॅपींग झाल्याचा
तपशिल विधानसभा मतदारसंघ - 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ
- क्षेत्राचे नाव - मिरा भाईंदर महानगरपालिका - मतदार केंद्रांची संख्या -
242, मतदारांची संख्या - 300857, मॅपींग झालेले मतदार - 98490, झालेली
टक्केवारी - 32.73, मॅपींग शिल्लक मतदार संख्या - 202367.
सन 2002 नुसार विधानसभा मतदार संघाचे नाव - 54 बेलापूर, मतदार केंद्रांची संख्या - 201, मतदारांची
संख्या - 214074.
सन २०२५ नुसार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मॅपींग झाल्याचा तपशिल विधानसभा मतदार संघ - 146 ओवळा माजिवडा विधानसभा
मतदार संघ - क्षेत्राचे नाव - ठाणे महानगरपालिका - मतदार केंद्रांची संख्या
- 245, मतदारांची संख्या - 278995, मॅपींग झालेले मतदार - 122598, झालेली
टक्केवारी - 43.94, मॅपींग शिल्लक मतदार संख्या - 156397.
सन 2002 नुसार विधानसभा मतदार संघाचे नाव एकूण मतदार केंद्रांची
संख्या -
216, मतदारांची संख्या - 231477.
सन २०२५ नुसार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मॅपींग झाल्याचा तपशिल विधानसभा मतदार संघ एकूण
मतदार केंद्रांची संख्या - 487, मतदारांची संख्या - 5798575, मॅपींग झालेले मतदार -
221088, झालेली टक्केवारी - 38.12, मॅपींग शिल्लक मतदार संख्या - 357764.
या कार्यक्रमामध्ये मतदारांना दोन प्रकारे मॅपिंग (Mapping) करता
येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मतदारांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत समाविष्ट
आहे. अशा मतदारांची Person to Person मॅपिंग (Mapping) करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची
नावे सन 2002 च्या मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना त्यांच्या आई-वडिल, आजी-आजोबा
यांच्या सन 2002 च्या मतदार यादीतील नावाशी Progeny Mapping करता येणार आहे. त्यासाठी
सन 2002 च्या सर्व मतदार याद्या मा.भारत निवडणूक आयोग यांच्या वेबसाईट वर पीडीएफ स्वरुपात
उपलब्ध आहेत. त्यासाठी https://voters.ect.gov.in
या लिंक वर जावून मतदार त्यांचे स्वतःचे नाव
सन 2002 च्या मतदार यादीतील तपशिल (जुना विधानसभा क्रमांक, त्यातील यादीभाग क्रमांक
व अनुक्रमांक) उपलब्ध करुन घेवू शकतात.
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी सन 2002
च्या मतदार यादीतील तपशिल घेवून आपले स्वतःचे व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव
मॅपिंग (Mapping) करण्यासाठी या विधानसभा मतदार संघातील यादीभागाचे मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याशी संपर्क साधून मॅपिंग करुन घेऊन SIR चे काम यशस्वीरित्या
पूर्ण करावे. ज्या मतदारांचे मॅपिंग होणार नाही अशा मतदारांना मतदार नोंद कशी खरी आहे,
हे सिध्द करावे लागणार आहे. जर मतदार सिध्द करु शकले नाहीत तर त्यांचे मतदारयादीतील
नाव कमी होऊ शकते.
तरी 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले
मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी
राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment