कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन
ठाणे, दि.2(जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध
मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013
मधील कलम 6(1) अन्वये ज्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील किंवा जेथे
नियुक्ती प्राधिकाऱ्याविरूध्द तक्रार असेल तर अशा तक्रारी जिल्हास्तरीय स्थानिक
समितीकडे करता येतील, अशी तरतूद दि.11 सप्टेंबर 2014 रोजीच्या शासन
निर्णयान्वे करण्यात आलेली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी स्थानिक समिती
कार्यरत आहे.
त्यानुसार घरकाम
करणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रात कार्रत महिला,
तसेच इतर असंघटीत क्षेत्रातील कार्यरत
महिला कामगार किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरूध्द तक्रार करावयाची असेल अशा
महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगीक हिंसाचाराबाबत जिल्हास्तरीय स्थानिक
समितीकडे 90 दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी,
असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी कार्यालय, पहिला मजला,
नियोजन भवन इमारत, कोर्ट
नाका, ठाणे या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन किंवा Shebox.wcd.gov.in
वर Register Complaint मध्ये
Online तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकरी, ठाणे
नमिता शिंदे यांनी कळविले आहे.
00000
.jpg)
Comments
Post a Comment