सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक
समितीची
नोंदणी SHE BOX
PORTAL वर
करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश
ठाणे, दि.2(जिमाका):-
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम
2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 4(1) अन्वये ज्या कार्यालयामध्ये
10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत
समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच सदरील अंतर्गत समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत.
त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर नोंदणी करण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे
यांनी आवाहन केले आहे.
वारंवार आवाहन करुनही ठाणे जिल्ह्यातील
खाजगी आस्थापना शाळा, कॉलेज, खाजगी कंपन्या, कारखाने, बँका, हॉस्पिटल्स, हॉटेल, शॉप
अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी आस्थापना इत्यादी सर्व आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर आपल्या आस्थापनेची व अंतर्गत समितीची नोंदणी
केलेली नाही. त्यामुळे या खाजगी आस्थापनांनी तात्काळ आपली नोंदणी SHE BOX PORTAL वर करावी, ज्या
खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन केलेली नाही त्यांना कायद्यामध्ये
दंडाची तरतूद केलेली आहे. त्याप्रमाणे जिल्हा कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात
येणार आहे.
SHE
BOX पोर्टलवर खाजगी
आस्थापनेतील अंतर्गत समिती नोंदविण्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे आहे. SHE BOX पोर्टलवर अंतर्गत समिती नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रिनवर
दाखविल्याप्रमाणे अंतर्गत समिती नोंदवा (Private Head Office Ragistration) या टॅब वर Click करुन आवश्यक त्या सर्व महितीचा तपशिल भरुन Submit या Tab वर Click करुन अंतर्गत समितीची महिती नोंदवता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकरी ठाणे
नमिता शिंदे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment