ठाणे जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयामार्फत खाजगी भूकरमापक सेवांसाठी ई-निविदा प्रसिद्ध
ठाणे,
दि.29 (जिमाका) : जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या प्रशासकीय मान्यतेन्वये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,
ठाणे या कार्यालयामार्फत ठाणे जिल्ह्यातील भूमापन व संबंधित तांत्रिक कार्य सुरळीत
व परिणामकारक रीतीने पार पाडण्यासाठी करार पद्धतीने संस्थेकडून खाजगी भूकरमापक सेवा
उपलब्ध करून घेण्यासाठी महा-टेंडर पोर्टलवर Tender ID : 2026_ SCDLR_1298696_1 अन्वये
ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या निविदा प्रक्रियेस जास्तीत जास्त पात्र व इच्छुक संस्थांकडून स्पर्धात्मक
प्रतिसाद प्राप्त व्हावा, तसेच निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, स्पर्धात्मकता व
प्रशासकीय कार्यक्षमता अबाधित राहावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख ठाणे नितीन
पाटील यांनी केले आहे.
000000000000
Comments
Post a Comment