राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमाचे आयोजन


ठाणे,दि.20(जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर सर्व स्तरावर क्षयरोग नियंत्रणाकरिता विविध विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. दि. 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये टी.बी. मुक्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनेश बा. सुतार यांनी कळविले आहे.

या वर्षाचे घोषवाक्य ‘होय! आपण क्षयरोगाचा निश्चित अंत करुन शकतो.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली, जनभागीदारीच्या बळावर.’ हे आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन