ठाण्यात उद्या मानसिक आरोग्यावर 'मान-सिक' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
मौन
सोडून संवाद साधण्याचे आवाहन
ठाणे,दि.23(जिमाका):- धकाधकीच्या जीवनात शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य जपणे, ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने ठाणे
जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'मान-सिक' (Man-Sick): जाणिवेतून जागृतीकडे या विशेष सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.
हा
कार्यक्रम उद्या, मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत, स्थळ: स्व.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आला
आहे.
या
कार्यक्रमात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अमोल
भुसारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते तरुणांमधील मानसिक आरोग्य, त्याबद्दलचे गैरसमज आणि सामाजिक कल्याण या
विषयांवर सखोल मार्गदर्शन करतील.
'रेझोनन्स कम्युनिकेशन्स' (Rezonanz Communications) द्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम
महाराष्ट्र शासनाच्या 'IEC
Bureau' च्या
सहकार्याने सुरू आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित सामाजिक भीती किंवा 'स्टिग्मा' दूर
करून तरुणांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे, हा
यामागचा मुख्य हेतू आहे. यामध्ये 'सिनेमॅटिक
इनिशिएटिव्ह'च्या माध्यमातून लघुपटांद्वारे प्रभावी
कथा सांगून प्रेक्षकांमध्ये सहानुभूती आणि जाणीव निर्माण केली जाते.
हा
उपक्रम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) 'Advancing Mental Health Care
in India' या
राष्ट्रीय ध्येयाला पाठिंबा देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालय व ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले
असून, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, वेसाकइंडिया (VesacIndia) आणि रेझोनन्स कम्युनिकेशन्स यांनी यामध्ये मोलाचे सहकार्य दिले आहे.
'मौन सोडू, संवाद साधू' आणि
'जाणिवेतून जागृतीकडे' वाटचाल करण्यासाठी ठाण्यातील नागरिक, तरुण आणि माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे
आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
000000
.jpg)
Comments
Post a Comment