शेतकऱ्यांनी
खरीप
हंगाम २०२6 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभागी होण्याची
अंतिम मुदत दि.3१ जुलै,
2026
ठाणे,दि.7(जिमाका)
: येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे
नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा
योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना
पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या बाबीमुळे पिकांच्या
उत्पादकतेमध्ये आलेली घट गृहीत धरून विमा संरक्षण
लाभणार आहे. खरीप हंगाम 2026 करिता सहभागाची अंतिम मुदत दि.3१ जुलै, 2026
अशी आहे.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी
ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक
पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवणे गरजेचे आहे. पिक विमा नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक
सर्वेक्षण (DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. कोकण विभागाकरीता शेतकरी
सहभागासाठी किमान क्षेत्र १० गुंठे
(०.१० हे.) असणे आवश्यक आहे.
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाकडून नियुक्त इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी,
पुणे मार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. कोकण विभागातल्या भात, नाचणी व उडिद पिकांकरीता विमा संरक्षित रक्कम व
विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा - ठाणे, पालघर,
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, पीक - भात, विमा संरक्षित रक्क (रु. /हेक्टर) - 65,000/-, शेतकऱ्यांनी
भरावयाचा विमा हप्ता (रु. /हेक्टर) - 650/-.
जिल्हा - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी
व सिंधुदुर्ग, पीक - नाचणी, विमा संरक्षित रक्क (रु. /हेक्टर) -40,000/-, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु. /हेक्टर) - 400/-.
जिल्हा - पालघर, पीक - उडीद, विमा संरक्षित रक्क (रु. /हेक्टर) -27,000/-, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु. /हेक्टर) - 540/-.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने व भाडेपट्टीने सुध्दा या योजनेत सहभागी होऊ शकतात. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न
होण्याचे घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम
मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. बँका, पतसंस्था, आपले
सरकार सेवा केंद्र तसेच अधिकृत विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत शेतकरी योजनेत भाग
घेऊ शकतात. तसेच शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून, क्रॉप इन्शुरन्स ऍप व AIDE ऍप
वापरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी
घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील, भाडेपट्टी करार
असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत नोंदणीकृत करारनामा, सामाईक खातेदारांच्या बाबतीत
संमतीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
योजनेचा दि.03 जुलै 2026 रोजीचा शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण उद्भवल्यास किंवा
योजनेबाबत अधिक माहितीकरीता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क
साधावा असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषि सहसंचालक शिवाजी आमले यांनी
केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment