ठाणे जिल्हा क्रीडा पुरस्कार करिता अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांचे आवाहन

 



ठाणे,दि.7(जिमाका) : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. सन 2024- 25२०२५-२६ या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारामध्ये प्रत्येक विजेत्याला रुपये दहा हजार, प्रमाणपत्र, आणि सन्मानचिन्ह असे बक्षिस दिले जाणार आहे. सन २०२४-२५ या वर्षाचे पुरस्काराकरिता 1 जुलै 2020 ते 30 जून 2025 पर्यंतची कामगिरी  तर सन 2025-26 करिता 1 जुलै 2021 ते 30 जून 2026 पर्यंतची कामगिरी ग्राह्य धरली जाईल.

गुणवंत खेळाडू पुरस्काराकरिता संबंधित जिल्ह्यांमध्ये खेळाडूंनी लगतपूर्व पाच वर्षांपैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे (ठाणे जिल्ह्याचे) मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिध्व केलेले असले पाहिजे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे (प) येथून प्राप्त करून घ्यावेत.

या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि.३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे बंद लिफाफ्यात सादर करावे, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक - ०२२  २५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम