इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित मुलांचे शासकीय वसतिगृह कल्याण येथे प्रवेश सुरु

 



ठाणे,दि.16(जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित मुलांचे शासकीय वसतिगृह, कल्याण, जि. ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 12 वी नंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. इमाव, विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनां मोफत निवास, तसेच भोजन भत्ता, निर्वाह भत्ता असा आर्थिक लाभ देखील देण्यात येतो. ठाणे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे.

अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून, अधिक माहिती ठाणे येथील सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, था मजला दत्तवाडी, कळवा जि. ठाणे या कार्यालयात उपलब्ध आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी कळविले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट