विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर

 


 

ठाणे, दि.16(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचा 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६' घोषित करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील मतदारांना नाव नोंदणी, दुरुस्ती व इतर तांत्रिक बाबींमध्ये सुलभता आणि मार्गदर्शन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व १९ विधानसभा मतदारसंघांनिहाय विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहेत.    

            या संदर्भातील सर्व अधिकृत संपर्क क्रमांक आणि वेळापत्रक निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.

            घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी जाऊन पडताळणी व भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल.

            मतदारयाद्यांची प्रारूप प्रसिद्धी ५ ऑगस्ट २०२६ रोजी केली जाईल, तर नागरिकांना आपल्या दावे व हरकती दाखल करण्यासाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ असा एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.

            प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींचा निकाल ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या नोटीस टप्प्यात लावला जाईल आणि अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

            मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून जारी करण्यात आलेल्या संपर्क क्रमांकांमध्ये, मुख्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील मदत कक्षासाठी ८०९७८६१९५०, ७०३९७६१९५० आणि ८०९७२८५५८९ हे क्रमांक उपलब्ध असतील.     

            मतदारसंघनिहाय संपर्कासाठी १३४-भिवंडी ग्रामीण (अ.ज.) करिता ०२५२२-२२१२१५, १३५-शहापूर (अ.ज.) करिता ०२५२७-२७२०६८, १३६-भिवंडी पश्चिमसाठी ८८२८७१५७६७, १३७-भिवंडी पूर्वसाठी ८१०८८३८८६६, १३८-कल्याण पश्चिमसाठी ०२५१-२३२३१३८, आणि १३९-मुरबाडसाठी ९३५९७३४४९३ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

            तसेच १४०-अंबरनाथसाठी ८७६७१७०१८४, १४१-उल्हासनगरसाठी ९४२१८७६८१२/८७६७१२११६५, १४२-कल्याण (पूर्व) साठी ९०२९६६५१५८/९१५२७८७६८०, १४३-डोंबिवलीसाठी ९३२४३४८७७९, १४४-कल्याण ग्रामीणसाठी - 9004576100, १४५ - मीरा - भाईंदरसाठी ०२२ - २८४५६१०४ आणि १४६ - ओवळा-माजीवडा मतदारसंघासाठी ८०९७८७७४७८, ९८९२६७६८२९ किंवा ०२२ - २१७३६१३० या क्रमांकांवर मतदारांना मदत मिळेल. याशिवाय १४७-कोपरी पाचपाखाडीसाठी ८६५५९७९७२२, १४८ - ठाणे मतदारसंघासाठी ९८२०७७१९१३, १४९ - मुंब्रा -कळवासाठी ९५९४७७६१५०, १५० - ऐरोलीसाठी ९३२१०२४३९३ आणि १५१ - बेलापूर मतदारसंघासाठी ९८३४६३५९३३ अथवा ९८९२४७९९९२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            त्याचप्रमाणे नागरिकांना थेट संपर्कासाठी जिल्हा निवडणूक शाखा, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे (पश्चिम) ४००६०१ येथे कार्यालयीन वेळेत भेट देता येईल. तसेच अधिक चौकशीसाठी ०२२ - २५४५४१४२ हा दूरध्वनी क्रमांक, dydeothane@gmail.com हा ई-मेल आयडी आणि www.thaneelection.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

            सर्व पात्र नागरिकांनी या पुनरीक्षण मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

0000000000

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम