हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्ष 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

 



ठाणे, दि. 22 (जिमाका) : हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि.24 व 25 जानेवारी  रोजी नांदेड येथे होणाऱ्या ऐतिहासिक शहिदी समागम कार्यक्रमास जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधीव मोहियाल व इतर सर्व समाजबांधवाना उपस्थित राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

            सर्वानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे. हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-की- चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती, शीख, सिखलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नांदेड येथे दि.24  व 25 जानेवारी 2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक शहिदी समागम कार्यक्रमास जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल व इतर सर्व समाज बांधवाना उपस्थित राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन