जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण संपन्न

 




ठाणे,दि.26(जिमाका) :- 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, शशिकांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी (सा.प्र.) रुपाली भालके,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितिन पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, रेवण लेंभे,  उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर,  सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

0000000000

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न