क्रीडा ई - प्रमाण" (Krida e-Pramaan) नोंदणी व लॉगिन मार्गदर्शन
ठाणे,दि.29(जिमाका) : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडुंना शासकीय / निमशासकीय
व इतर क्षेत्रात नोकरीमध्ये 5 टक्के खेळाडु आरक्षण क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीमध्ये
मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी आणि पडताळणी
प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी, अदयावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ब्लॉकचेन आधारित
"क्रीडा ई - प्रमाण" प्रणालीचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या
दि.08 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रणालीनुसार
ज्या खेळाडुंना प्रमाणपत्रांची पडताळणी करुन घ्यावयाची आहे, त्यांनी खालीलप्रमाणे विहीत
कार्यपद्धतीची अंमलबजावणी करावी.
सर्वप्रथम https://sports.maharashtra.gov.in/
या क्रीडा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या पृष्ठावरील "माझ्या सेवा" हा पर्याय निवडुन 5% आरक्षण या सेवेमध्ये जावे.
या सेवेमध्ये Register here वर क्लिक करुन नोंदणी प्रक्रिया सुरु करावी. या नोंदणी
प्रक्रियेमध्ये आवश्यक ती वैयक्तिक माहिती अचूक भरावी. आपला वैयक्तिक ई-मेल आणि मोबाईल
क्रमांकावर प्राप्त झालेल्या OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी. ई-मेलद्वारे प्राप्त
झालेल्या Credentials चा वापर करुन लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर आवश्यक असल्यास आपला
पासवर्ड रिसेट करावा. त्यानंतर Request Certificate या विभागामध्ये जाऊन आपली संपूर्ण
व अचूक स्पर्धाविषयक माहिती भरावी व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी करताना
नाव, जन्मतारीख, ई-मेल व मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावी. OTP पडताणीसाठी नोंदणीकृत ई-मेल
व मोबाईल उपलब्ध ठेवावा. प्रमाणपत्र विनंतीमध्ये भरलेली माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे
स्पष्ट, पूर्ण आणि अधिकृत असावीत. खोटी / असत्य माहिती भरु नये.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) ४००६०१ येथे किंवा www.dsothane२०२०.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी, असे आवाहन सुवर्णा बारटक्के,
जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांनी केले आहे.
00000000000
Comments
Post a Comment