फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ

 



ठाणे, दि.09(जिमाका) :- कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य सांख्यिक कृषि आयुक्तालय पुणे यांनी दिली आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येते. कोकण विभागात आंबिया बहार 2025-26 मध्ये आंबा व काजू या पिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर,2025 होती. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in  वर सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे सहभागाचा कालावधी वाढवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली आहे.

कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळपिक विमा विमा योजनेत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे शिवाजी आमले यांनी केले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न