महिला बचतगटाच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू लोकशाहीची गुढी

 


 



 

  ठाणे,दि.29(जिमाका) :- आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या वतीने उथळसर प्रभाग समितीअंतर्गत (प्रभाग क्र. 10, 11 व 12) आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सिध्देश्वर तलाव परिसर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

   मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मूलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी 'आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण'... हा नारा घेऊन  एकता महिला बचतगटातील महिला जेथे वास्तव्य करतात तेथील परिसरात मतदान जनजागृती करत लोकशाहीची ही गुढी उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

00000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट