राज्यस्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन

 




ठाणे,दि.10,(जिमाका) :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे  अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्ममाने कुळगाव बदलापुर पुर्व येथे दि. 12 ते 14  डिसेंबर 2025 या कालावधीत शासकीय शालेय क्रीडा- 2025-26 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांनी दिली आहे.

सन 2025-26 च्या राज्यस्तरीय शालेय हॅण्डबॉल (14 वर्षे  मुले व मुली) क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी यंदा ठाणे जिल्ह्याकडे सो‍पविण्यात आलेली आहे. ही स्पर्धा दि.12 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत आदर्श विद्या मंदिर, कुळगाव बदलापुर पुर्व ता.अंबरनाथ, जि. ठाणे येथे घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 8 विभागातून 16 संघातील सुमारे 317 खेळाडू मुले/मुली, मार्गदर्शक, अधिकारी आणि पंच सहभागी होत आहेत. तसेच जिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना ट्रॅकसूट तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंना डिजीटल स्मार्ट वॉच अशी विशेष भेट वितरीत करण्यात येणार आहे, असे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट