डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची सन 1982-83 पासून राबविण्यात येत असलेली “ अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) ” बदललेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता विचारात घेता ही योजना सुधारित करुन “ डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ” या नावाने दि.5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत दि.1 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये सन 2024-25 या वर्षात खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या उच्चतम मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. 1) नवीन सिंचन विहीर:- उच्चतम अनुदान मर्यादा: रु.4 लाख 2) जुनी विहीर दुरुस्ती:- उच्चतम अनुदान मर्यादा: रु.1 लाख 3) शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण:- उच्चतम अनुदान मर्यादा: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याच्या आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा...