Posts

Showing posts from June, 2020

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

Image
ठाणे दि. १८ (जिमाका ) ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पाच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एन.के. टी. सभागृह ,   ठाणे येथे जाहीर करण्यात आली.           यावेळी उप जिल्हाधिकारी ( प्रशासन) अभिजीत भांडे पाटील यांनी उपस्थितांना आरक्षण सोडत प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी तहसीलदार ( सर्वसामान्य) राजाराम तवटे ,   राजकीय पक्षांचे प्रतिनिधी , मा. विधानसभा सदस्य , पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. ही प्रक्रिया कोव्हिड-१९ बाबत शासन निर्देशांचा अवलंब करून मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. सदर आरक्षण खालील प्रमाणे १)     अध्यक्ष जिल्हा परिषद , ठाणे    नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला) २)        पंचायत समिती , शहापुर        अनुसूचित जमाती ( महिला ) ३)     पंचायत समिती , अंबरनाथ        अनुसूचित जमाती ( महिला ) ४)   ...

२२ व २३ जून २०२० रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन

ठाणे दि. १८ (जिमाका) लॉक डाऊन काळामध्ये शिथिलता दिल्यामुळे जिल्हातील अनेक औदयोगिक कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. परप्रांतीय मजूर बाहेरगावी गेल्यामुळे कंपन्याना मनुष्यबळाची उणीव भासत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हातील   कंपन्यानी एकूण १०० रिक्त पदे उपलब्ध करुन दिलेली आहे. ही पदे भरुन बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभाग ठाणे यांनी दिनांक २२ व २३ जून २०२० रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार मेळावा या ऑप्शन वर लॉग ऑन करुन त्यामध्ये दिलेल्या एनसीएस च्या www.ncs.gov.in या वेब साईटवर नोंदणी करून शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी पसंतीक्रम नोंदवावा. यानंतर उमेदवारांना उदयोजकांच्या सोयीनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.अधिक माहितीसाठी श्रीमती.कविता.ह.जावळे मो.न -९७६९८१२००९ व श्री.आशुतोष साळी मो नं ९८९२५२४६८५ यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती.कविता.ह.जावळे सहायक आयुक्त जिल्...

आय.आय.एच.टी बरगढ़, वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश घेण्याचे आवाहन

    ठाणे दि. १८(जिमाका) केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) करिता १३ व वेकटगिरी करिता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग , नागपूर , सोलापूर , मुंबई , औरंगाबाद , यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. १७ जुलै २०२० पर्यंत मागविण्यात येत आहेत.प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालय वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त , वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे डॉ. माधवी खोडे चवरे , भा प्र.से. आयुक्त वस्त्रोद्योग , महाराष्ट्र राज्य , नागपूर यांचे कडून कळविण्यात आले आहे. 00000

कॅान्टॅक्ट ट्रेसींग, कंटेनमेंट झोन आणि रूग्णालय व्यवस्थापन यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा- मुख्य सचिव अजोय मेहता*

Image
ठाणे दि.१२-  राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज कोरोना कोव्हीड 19 च्या पार्श्वर्भूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेवून कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे, कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढवून त्याची कडक अंमलबजावणी करणे आणि रूग्णालय व्यवस्थापन आदी गोष्टींवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावेळी नगर विकास विभाग(2) चे प्रधान सचिव महेश पाठक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.       बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्यावतीने कोरोना कोव्हीडच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण कण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी प्रभाग समितीनिहाय कोरोना कोव्हीड 19 च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधला. तसेच प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तींच्या किमान 20 लोकांचे कॅान्टॅक्ट ट्रेसींग करण्याची आवश्यकता आहे तरच कोरोनाची साखळी तोडता येईल असे सांगितले. व...

ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच सेवेत दाखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा

·       ५०० ऑक्सिजन व ५०० नॉन ऑक्सिजन बेड्स ·       १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, लॅब्जचीही सुविधा ·       गरज पडल्यास बेड्सची संख्या आणखी वाढवण्याची क्षमता ठाणे दि. 11:– ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या १ हजार खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने आणि अधिक प्रभावी पावले उचलण्यासाठी आघाडीवर राहून करोनाविरोधातील या लढाईचे नेतृत्व करत आहेत. तसेच, कोव्हिड रुग्णालये व क्वारंटाइन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्रुटी दूर करत आहेत. करोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रु...

केंद्रीय पथकाने केली ठाण्याची पाहणी* प्रतिबंधित झोन, कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट

Image
ठाणे(७) कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय पथकाने ठाणे शहरामधील प्रतिबंधित क्षेत्र, कोव्हीड हाॅस्पीटल्स, कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजना आणि केलेली कार्यवाही याची महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. दरम्यान ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारण्यात येत असलेल्या १००० बेडच्या हाॅस्पीटलची पाहणी करून केंद्रीय पथकाने महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सनदी अधिकारी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आज सकाळपासून ठाणे शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. सर्वप्रथम त्यांनी मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रतिबंधित झोन, घरोघरी करण्यात येणारे ताप सर्वेक्षण, कोव्हीड योद्धा याविषयी माहिती घेतली. तसेच कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा प्रेक्षागृह येथे उभारण्यात येत असलेल्या १००० खाटांच्या कोव्हीड हाॅस्पीटलची पाहणी केली.  त्यानंतर त्यांनी लोकमान्यनगर- सावरकर नगर प्रभाग समितीला भेट दिली. याभेटीमध्ये त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रे, फिव्हर क्लिनिकची पाहणी केली. तसेच तेथील डाॅक्टरांशीही चर...

कोरोना भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख

Image
ठाणे दि. ६:करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आहे. ही भिती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करा  अशा सुचना मत्स्यविकासमंत्री  अस्लम शेख यांनी दिल्या.  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  करोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय  पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी  घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त  श्री आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  श्री शेख यांनी  जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना  त्यांनी केल्या.  करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची सं...

निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात जिवितहानी नाही

ठाणे दि 3 (जिमाका): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे  जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे व कच्ची घरे  पडण्याचे  प्रकार घडले.मात्र  जिल्ह्यात जिवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली ठाणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून  मिरा भाईदर महानगरपालिका ७००,कल्याण ग्रामीण ३६१,शहापूर (१९ गावे) १०६७,नवी मुंबई मनपा ४६२,कल्याण डोंबिवली मनपा ५०० अशा एकूण ३०९०  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे उल्हासनगर नगर मध्ये ११,भिवंडी 2 मुरबाड १४ शहापूर मध्ये ३,अंबरनाथ ३,एकूण ३३ घराचे नुकसान झाले आहे. तसेच ठाणे मध्ये ५३,कल्याण  ५०,भिवंडी ११ मिरा भाईदर ११,उल्हासनगर ३८,अंबरनाथ १५,कुलगाव बदलापूर १४ एकुण १९२ झाडे पडली आहेत. व उल्हासनगर मध्ये १ विज खांब पडला आहे. कल्याण मध्ये 3 बकरी मयत झाले आहेत. (सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार)

*चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये* *नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे दि.1(जिमाका) : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.  याकाळात  समुद्र खवळलेला राहणार आहे.उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याचपार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.  अरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका...

ठाणे शहरातील रूग्णालयांमधील बेड उपलब्धतेची माहिती एका क्लीकवर* महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे दि. १- ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना  महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी  www.covidbedthane.in  हे विशेष संकेतस्थळ विकसित  केले आले आहे.  शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता यावे यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये युद्धपातळीवर ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.       ठाणे शहरामध्ये कोणती रूग्णालये कोव्हीड रूग्णालये आहेत, त्याची एकूण क्षमता काय आहे, तिथे रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाटांची उपलब्धता आहे किंवा नाही याची ॲानलाईन माहिती ठाणेकर नागरिकांना मिळावी यासाठी विशेष संकेतस्थळ निर्माण करण्याच्या सुचना   पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  दिल्या होत्या.  त्यानुसार  महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. या संकेतस्थळावर रूग्णालयाचे नाव, ते रूग्णालय ...