*चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये* *नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन


ठाणे दि.1(जिमाका) : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये तसेच
नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

 याकाळात  समुद्र खवळलेला राहणार आहे.उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याचपार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 अरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव  मच्छिमार बांधवांनी  सदरच्या काळात  समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी परत बंदरात सुखरुप परत यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी केले

     चक्रीवादळाच्या कालावधीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 022-25301740/25381886 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी केले

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न