जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान



ठाणे,दि.27(जिमाका):- शासनाच्या ‘मिशन 100 डेज् अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथील उपलब्ध औषधसाठा, स्वच्छता तसेच इतर सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची खातरजमा करण्यासाठी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली.

यावेळी त्यांनी आपली ईसीजी चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट अवघ्या 3 मिनिटात प्राप्त झाला. या घटनेमुळे प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या तत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी आरोग्य विभागाचे आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दिलेल्या अचानक भेटीचे कौतुक केले.



याप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपल्या हातून जनतेची सेवा घडत राहावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळायला हवा. यासाठी सर्वांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे आपली कर्तव्यपूर्ती करावी.



या भेटीप्रसंगी शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुले, शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कमळ व वॉटर लिली रोपांची लागवड