मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

ठाणे,दि.01(जिमाका):- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, ठाणे यांच्या वतीने दि.27 जुलै 2025 रोजी सहकार विद्यालय, कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्दिष्ट गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आजारी नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि मुख्यमंत्री आरोग्य निधीची माहिती व मदत पुरविणे हे होते. या शिबिरात विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे तज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये 1 हजार 510 नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या शिबिरत ECG, रक्तदाब, हृदय विकार तपासणी, मोतीबिंदू, चष्म्याची तपासणी, श्रवण तपासणी, घसा तपासणी, महिलांचे आरोग्य, लहान मुलांची तपासणी, पोषण तपासणी, सांधेदुखी, हाड तपासणी, दातांचे आरोग्य व स्वच्छता, अॅलर्जी, त्वचेचे विकार, होमिओपॅथी – पर्यायी औषधे व जीवनशैली सल्ला इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. काही रुग्णांकरिता CBE (Clinical Breast Examination) हे मॅमोग्राफी व्हॅनच्या सहायाने करण्यात आले. अशा शिबिरांमध्ये न्यूरोसर्जन विभाग हा फार महत्त्वाचा ठरतो, कारण मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची ल...