अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

ठाणे,दि.01(जिमाका):- शहापूर तालुक्यासारख्या दुर्गम भागात जिथे दळणवळणाच्या सोयी मुबलक प्रमाणात आहेत व वस्ती देखील विखुरलेल्या स्वरूपात आहे, अशा ग्रामीण ठिकाणी लोकांना आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे सहज शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे ग्रामीण यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच बँकेच्या योजनांच्या माहितीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मराठा समाजाचा एकही गरजू घटक योजनेपासून दूर राहू नये, याकरिता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील झपाट्याने काम करीत आहेत. कोकण विभागात लाभार्थी संख्या वाढावी याकरिता आम्ही देखील खेड्यापाड्यात जाऊन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत आहोत, असे विभागीय समन्वयक प्रतीक्षा चव्हाण यांनी सांगितले.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना बँकांकडून कर्जपुरवठा कशाप्रकारे सुलभतेने मिळवता येईल याबद्दल जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर RSETI (rural self employment training institute) याचा कशाप्रकारे जास्तीत जास्त नागरिक लाभ घेऊ शकतात याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर देशमुख, मराठा महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक शुभम शिंदे, संदेश काटकर, संध्या पाटेकर, आकाश सावंत, संदेश पाटेकर व खातिवली, टेंभुर्लि, खराडी, वाशिंद, निमनपाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ