सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेकांमी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
ठाणे दि .14 ( जिमाका ) :- सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळ ण्यासाठी प्रस्ताव सादर करा वे . शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय, ठाणेकडे दि. 15 जून 2021 ते दि. 19 जून 2021 कार्यालयीन वेळेत (स.11 ते दु. 4) प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (ई.10 वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ. 8वी किंवा 9 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. उच्च माध्यमिक शालांत प्रताणपत्र परिक्षा (इ. 12 वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत ई. 11 वी मध्ये क्रीडा स्पर्...