सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेकांमी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


 

ठाणे  दि.14 (जिमाका) :- सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय, ठाणेकडे              दि. 15 जून 2021 ते दि. 19 जून 2021 कार्यालयीन वेळेत (स.11 ते दु. 4) प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावे.

 

            माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (ई.10 वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ. 8वी किंवा            9 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

 

            उच्च माध्यमिक शालांत प्रताणपत्र परिक्षा (इ. 12 वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत ई. 11 वी मध्ये क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

 

            शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सहभाग व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहतील.

 

            इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असलेतरी सदर खेळाडूचे सर्वोच्च कामगीरी असलेल्या एकाच खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे.

 

            सदर खेळाडूंचे वाढीव (ग्रेस मार्क) प्रस्ताव जमा करण्याची अंतिक तारीख 19 जून 2021 (कार्यालयीन वेळोपर्यंत राहील) त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावांचा स्विकार केला जाणार नाही. संबंधित खेळाडू क्रीडा गुणापासून वंचीत राहिल्यास संबधीत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांची  जबाबदारी राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.

            सोबत जोडावयाची कागदपत्रे.

1. इयत्ता 10 वी, 12 वी परिक्षा प्रवेशपत्र नसेल तर (Hall Ticket List)

2. मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले खेळाचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र.

3. क्रीडा सवलत गुण अर्ज विहितनमुना.

00000000

 

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न